IMPIMP

पुण्याच्या बड्या कंपनीतील ‘त्या’ महिलेला Facebook वर झालेली मैत्री 4 कोटींना पडली, झाली फसवणूक

by Team Deccan Express
Cyber

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – पुण्यातील 60 वर्षीय जेष्ठ महिला फेसबुकवर Facebook झालेली मैत्री 4 कोट रुपयांना पडली असून, त्या सायबर चोरट्याने त्यांना वाढदिवसाला आयफोन पाठवला आहे, असे सांगत त्यांच्याकडून हे पैसे उकळले आहेत. यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.

Social Media Reactions : ‘मुख्यमंत्री साहेब, 2 तासात तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न लावून दाखवा’

याप्रकरणी 60 वर्षीय महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या एका बड्या कंपनीत मोठ्या पदावर आहेत. त्यांचे फेसबुकवर Facebook खाते आहे. दरम्यान त्यांना गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात एका अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिकव्हेस्ट आली होती. त्यांनी ती स्वीकारली होती. त्यानंतर त्यांच्यात चॅटिंगच्या माध्यमातून बोलने सुरू झाले. या कालावधीत त्याने आपण ब्रिटनमध्ये असल्याचे फिर्यादी यांना सांगितले. तर एका कंपनीत काम करतो, अशी बतावणी करत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याशी व्हाट्सआपला बोलण्यास सुरुवात केली. यातून त्यांच्यात मैत्रीचे संबंध निर्माण झाले.

सुट्टीवर गावाकडे आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे माओवाद्यांनी केले अपहरण

दरम्यान फिर्यादी यांचा सप्टेंबर महिन्यात वाढदिवस असतो. त्यावेळी आरोपींने त्यांना वाढदिवसाचे गिफ्ट पाठवायचा असल्याचा बहाणा केला. तसेच त्यांना एक आयफोन पाठवत असल्याचे सांगितले. त्यानुसार आयफोन पाठवला असल्याची माहिती दिली. यानंतर त्यांना काही दिवसांनी दिल्ली येथे कस्टमकडे आले आहे. पण ते सोडविण्यासाठी त्यांना पैसे भरण्यास सांगितले. मग फिर्यादी यांनी काही पैसे भरले. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या 6 क्रमांकावरून फोन येण्यास सुरुवात झाली. त्यात त्यांना आयफोन, विदेशी चलन आणि इतर वस्तू देखील पाठवल्या असून, त्या दिल्लीत पकडल्या आहेत, त्या सोडवण्यासाठी म्हणून पैसे भरण्यास भाग पाडले. फिर्यादी यांनी आरोपींनी सांगितल्याप्रमाणे तबल 3 कोटी 98 लाख 75 हजार रुपये भरले आहेत. हे पैसे 25 वेगवेगळ्या बँक खात्याच्या 67 खात्यावर भरण्यात आले आहेत. 4 कोटी रुपये भरून देखील कोणतेच गिफ्ट न आल्याने त्यांनी याबाबत चौकशी केली. त्यावेळी त्यांना फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. सायबर पोलिसांनी या तक्रारीची पडताळणी केली. त्यात फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर काल याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक चिंतामण हे करत आहेत. दरम्यान महिलेने आपले नाव उघड होऊ नये अशी विनंती पोलिसांना एका अर्जाद्वारे केली आहे. त्यानुसार त्यांची गोपनीयता ठेवून या गुन्ह्याचा तपास केला जात आहे.

Also Read :

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

Related Posts