IMPIMP

Maharashtra Monsoon Assembly Session | आता खरे मुख्यमंत्री कोण आहेत ? हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच – आदित्य ठाकरेंचा दावा

by nagesh
this traitorous government will collapse says aaditya thackeray Maharashtra Monsoon Assembly Session

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Monsoon Assembly Session | विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Monsoon Assembly Session) आज पासून सुरुवात झाली आहे. त्यावेळी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर निषेध करताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, हे गद्दार सरकार आहे, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच. तसेच आमदार प्रकाश सुर्वे (MLA Prakash Surve) यांच्या वक्तव्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, हे डरपोकांचं विधान आहे. मुख्यमंत्री (CM) आणि खऱ्या मुख्यमंत्र्यांचा काही अंकुश राहिलेला नाही. आता तुम्ही मला सांगा खरे मुख्यमंत्री कोण आहेत ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Monsoon Assembly Session) पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून ईडी सरकार हाय हाय, स्थगिती सरकार हाय हाय अशी घोषणाबाजी करुन शिंदे – फडणवीस सरकारचा जोरदार निषेध केला.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही लोकशाहीचा खून करणाऱ्यांच्या विरोधात उभे आहोत. हे गद्दार सरकार आहे, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच. हे घटनाबाह्य सरकार आहे, बेकायदेशीर सरकार आहे, बेईमानांचं सरकार आहे.

मंत्रिमंडळ विस्तारावर (Cabinet Expansion) बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले,
या परिस्थिती शेतकरी, महिला यांचा आवाजाचा कोणीच विचार करत नाही.
स्वत: ला काय मिळालं, मिळालं नाही याचा विचार करत आहे. जे आमच्यात मंत्री होते तेच तिकडे जाऊन मंत्री झाले आहेत.
डाऊनरेट झाले आहेत. जे त्यांचे निष्ठावंत होते, जो पहिला गट गेला त्यांना काहीच मिळालं नाही.
म्हणजे या गद्दारांनी पुन्हा एकदा दाखवलं की निष्ठेला स्थान नाही, अपक्षांना स्थान नाही, महिलांना स्थान आणि मुंबईकरांना स्थान नाही.
ज्या लोकांची निष्ठा एका माणसासोबत राहिली नाही, ते अशा लोकांसोबत कसे राहतील त्यांना त्याठिकाणी काहीच मिळाले नाही.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : – this traitorous government will collapse says aaditya thackeray Maharashtra Monsoon Assembly Session

हे देखील वाचा :

Maharashtra Monsoon Session | विधानभवनात शिंदे गटाची माघार, मात्र व्हिपवरून जुंपली

SBI Doorstep Banking | तुमच्या घरापर्यंत येईल बँक, मोफत देईल सर्व सेवा…जाणून घ्या कसा मिळेल लाभ

Related Posts