IMPIMP

Pune News : TikTok स्टार समीर गायकवाडची गळफास घेऊन आत्महत्या

by sikandershaikh
Sameer-gaikwad

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनटिकटॉक स्टार व इन्टाग्राम स्टार समीर गायकवाड (sameer gaikwad) याने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. समीरचा भाऊ प्रफुल्ल गायकवाड याने लोणीकंद पोलिसांना या दुदैवी घटनेची माहिती दिली. समीर मनीष गायकवाड (sameer gaikwad) (वय २२, रा. निकासा सोसायटी, वाघोली) हा टिकटॉक स्टार होता.समीर याने रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वाघोली येथील राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

समीरला पंख्याला लटकलेला पाहिल्यावर घरातील लोकांनी त्याला खाली उतरविले. तातडीने जवळच्या लाईफ लाईन हॉस्पिटलला नेले. पंरतु, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाला असल्याचे सांगितले. समीर याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. त्याने घरातही आत्महत्येपूर्वी काही चिठ्ठी लिहून ठेवली असल्याचे आढळून आले नाही. लोणीकंद पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे.

समीर याच्या मृत्युची बातमी समजताच अनेक नेटकर्‍यांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली. समीर पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. म्युझिक व्हिडिओ व शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून समीर तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला होता. आपल्या व्हिडिओमधून तो प्रेरणादायी विचार मांडत होता. समीर हा ब्लॉगर म्हणूनही प्रसिद्ध होता. त्याचे रेडलाईट डायरीज ही मालिका गाजली होती. प्रेम प्रकरणातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जाते.

Related Posts