IMPIMP

Tim Southee | न्यूझीलंडचा फास्ट बॉलर टीम साऊदीने तोडले 42 वर्षाचे जुने रेकॉर्ड; 5 विकेट घेणार ठरला पहिलाच गोलंदाज

by nagesh
Tim Southee | kanpur test southee picks 5 wickets after shreyas iyer s debut test ton india 338 8 at lunch on day 2

कानपुर : वृत्तसंस्था टीम साऊदीच्या (Tim Southee) भेदक गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत दमदार पुनरागमन केले आहे. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम साऊदीने अचूक मारा करत पहिल्या सत्रात 4 विकेट्स घेतल्या आहेत. श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) शतकी खेळीमुळे टीम इंडियाने 300 धावांचा टप्पा पार केला आहे. कानपूरमध्ये 42 वर्षांनंतर परदेशी वेगवान गोलंदाज टीम साऊदीने (Tim Southee) 5 विकेट घेतल्या आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने 258 रन्सवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. दिवसाच्या तिसऱ्या षटकात टीम साऊदीने रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) बोल्ड करत संघाला पहिले यश मिळवून दिले. जडेजाला आज एकही रन करता आली नाही. यानंतर साऊदीने ठराविक फरकाच्या अंतराने टीम इंडियाला धक्का देत टीम इंडियाचा संपूर्ण डाव ३४५ वर समाप्त झाला. या सामन्यात भारताच्या श्रेयस अय्यरने 171 चेंडूत 105 धावा केल्या आहेत.

कानपूरमध्ये (Kanpur) 1979 नंतर किवींकडून परदेशी वेगवान गोलंदाज टीम साऊदीने (Tim Southee) एका डावात 5 बळी घेतले.
यापूर्वी 1979 मध्ये पाकिस्तानच्या (Pakistan) सिकंदर बख्त (Sikander Bakht) आणि एहतेसामुद्दीन (Ehtesamuddin) यांनी ही कामगिरी केली होती.
टीम साऊदीशिवाय काईल जेमिसनलासुद्धा (Kyle Jamieson) 3 विकेट घेण्यात यश आले आहे.
न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाना अजून प्रभावीपणे गोलंदाजी करता आलेली नाही.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- Tim Southee | kanpur test southee picks 5 wickets after shreyas iyer s debut test ton india 338 8 at lunch on day 2

हे देखील वाचा :

Samantha Prabhu | घटस्फोटानंतर समंथा प्रभू झाली ‘बायसेक्सुअल’, नक्की जाणून घ्या काय आहे या मागचं सत्य?

IPL 2022 | राजस्थानच्या टीमने बेन स्टोक्सला धक्का देत ‘या’ दिग्गज खेळाडूला केलं रिटेन

Sanjay Raut | राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला? संजय राऊत म्हणाले…

Related Posts