IMPIMP

Travel Insurance | कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची दहशत ! प्रवास करणे असेल आवश्यक तर काढा ट्रॅव्हल इन्श्युरन्स, जाणून घ्या कसा होईल फायदा

by nagesh
Travel Insurance | corona omicron variant panic if it necessary to travel then get travel insurance

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Travel Insurance | आफ्रीकन देशांमध्ये कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron variant of Corona) सापडल्याने संपूर्ण जगात दहशतीचे वातावरण आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षा 10 पट जास्त वेगाने पसरतो, असे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत WHO ने कोणताही दुजोरा दिलेला नाही. (Travel Insurance)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

परदेशात उपचार करणे खुप महाग
तरी सुद्धा तुम्हाला या काळात परदेश किंवा देशांतर्गत प्रवास करायचा असेल तर सुरक्षित राहण्यासाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स (travel insurance) काढणे आवश्यक आहे. कारण जर तुम्ही परदेशात आजारी पडलात तर उपचार करणे खुप महाग असू शकते.

अशावेळी ट्रॅव्हल इन्श्युरन्स (travel insurance) घेतल्यास तुमचा पूर्ण वैद्यकीय खर्च विमा कंपनी करेल. तर ट्रॅव्हल इन्श्युरन्सचे इतर अनेक फायदे सुद्धा आहेत. याबाबत जाणून घेवूयात…

प्रवास विमा का आहे आवश्यक –
सध्यस्थितीत जर परदेश प्रवासादरम्यान तुमच्या समोर मेडिकल इमर्जन्सी आली तर खर्चामुळे त्रस्त होऊ शकता. अशावेळी इन्श्युरन्स असल्यास विमा कंपनी उपचारावर विमित रक्कमेच्या बरोबरीचे कव्हर देईल. ही सुविधा देशांतर्गत सुद्धा उपलब्ध आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

प्रवास विम्यासाठी आवश्यक पात्रता –
ट्रॅव्हल इन्श्युरन्स कव्हर घेण्यापूर्वी पात्रता तपासून घ्या. हे त्यावर अवलंबून आहे की, तुम्ही कोणता इन्श्यूरन्स घेणार आहात. फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स (travel insurance) अंतर्गत तुम्ही, तुमच्यावर अवलंबून असणारा जोडीदार आणि दोन मुलांना कव्हर दिले जाईल.

ग्रुप ट्रॅव्हल अंतर्गत 10 लोकांना कव्हर
प्रौढांचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान आणि मुलांचे वय 6 महिने ते 21 वर्षापर्यंत असू शकते. सोबतच ज्येष्ठ नागरिकांना प्रवास विमा अंतर्गत वय 60 वर्षापेक्षा जास्त असावे आणि ग्रुप ट्रॅव्हल इन्श्युरन्स (Group travel insurance) अंतर्गत किमान 10 लोकांना कव्हर मिळते.

500 रुपयांपासून 2 हजारपर्यंत खर्च –
ट्रॅव्हल पॉलिसीचा खर्च यावर अवलंबून असतो की, ट्रॅव्हलिंग कॉस्ट किती आहे, तुमचे वय, विमित रक्कम किती आहे.
याशिवाय सुद्धा अनेक फॅक्टर्सवर सुद्धा हे अवलंबून असते की, तुम्ही कोणता प्रवास करत आहात आणि किती दिवसांसाठी.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

उदाहरणार्थ समजा की, तुम्हाला एक महिन्यापेक्षा कमी काळासाठी मेक्सिकोला जायचे आहे.
तर 1 लाख डॉलर (74 लाख रुपये) च्या सम इंश्युअर्डसाठी तुम्हाला 580 रुपयांपासून 1254 रुपये पर्यंत पैसे द्यावे लागू शकतात.

प्रवासापूर्वी 15 दिवस अगोदर पॉलिसी घेणे चांगले –
काही विमा कंपन्या प्रवास सुरू करण्याच्या दिवसापर्यंत प्रवास विमा घेण्याची सुविधा देतात.
परंतु तो खरेदी करण्याचा चांगला काळ प्रवास सुरू करण्याच्या 15 दिवस अगोदर असतो.

यामुळे तुम्हाला काही बोनस कव्हरेज मिळण्याची शक्यता वाढते.
बहुतांश कंपन्या प्रवासाच्या दिवशी विमा काढण्याची संधी देत नाहीत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- Travel Insurance | corona omicron variant panic if it necessary to travel then get travel insurance

हे देखील वाचा :

Isha Ambani | अबब…! मुकेश अंबानीची मुलगी ईशानं 3 लाखाचा ड्रेस घालून केलं फोटोशूट

Nawab Malik | कोरोना काळात सरकारच्या हलगर्जीपणामुळे राज्यात एकही मृत्यू नाही, नवाब मलिकांचा पुण्यात दावा (व्हिडिओ)

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात महिलेच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Related Posts