IMPIMP

Uday Samant | उदय सामंतांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेची तुलना बाळासाहेबांच्या सभेसोबत, आदित्य ठाकरेंना नाव न घेता लगावला टोला

by nagesh
Uday Samant | as no one has come with a power dont show it off says uday samant

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटातील (Shinde Group) वाद आता चांगलाच विकोपाला गेला आहे. दसरा मेळाव्यावरुन (Dasara Melava 2022) देन्ही गट आमने-सामने आले असून आमचाच दसरा मेळावा खरा असल्याचा दावा दोन्ही गटांनी केला आहे. शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु केली असून त्यापूर्वी शिंदे गटाने शिवसेनेचं संपर्क अभियान सुरु केले आहे. या संपर्क अभियानात बोलताना उदय सामंत (Uday Samant) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचं कौतुक केलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या सभेला होणारी गर्दी पाहून बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) सभांचा भास होतो, असेही उदय सामंत (Uday Samant) म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शिवसेनेचं संपर्क अभियान मुंबईत चालू आहे, त्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला दिली आहे. आज दोन मेळावे झाले दोन्ही मेळावे फार मोठे झाले आहेत. सभा घेणं हा लोकशाहीचा अधिकार आहे, शेवटी कायदा आणि सुव्यवस्था (Law and Order) राखणे ही सभेला येणाऱ्या लोकांची देखील जबाबदारी आहे, असे उदय सामंत (Uday Samant) यांनी मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटले.

महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंच्या सभेला जी गर्दी होते, ती स्वर्गीय बाळासाहेबांच्या सभेसारखी असते.
म्हणूनच एकनाथ शिंदेंच्या सभा या बाळासाहेबांच्या आहेत की काय, असा भास होतो.
कारण एवढी लाखो लोकांची गर्दी सभांना होत आहे, असे म्हणत सामंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेची तुलना
बाळासाहेबांच्या सभेसोबत केली. तसेच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या सभेवर नाव न घेता टीका केली.
आमच्याकडे दापोलीला काहीजण सभेसाठी आले होते, एखादा कोपरा पाहायचा, राष्ट्रवादीचे (NCP) लोक भगवा झेंडा
घेऊन जमवायचे आणि आम्हाला शिव्या द्यायच्या, असे म्हणत सामंत यांनी आदित्य ठाकरेंच्या सभेवर टीका केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतुक करताना उदय सामंत म्हणाले,
त्यांची काम करण्याची पद्धतच वेगळी आहे. अतिशय वेगाने ते काम करतात.
22 तारखेला आमची बैठक घेतली आणि 28 तारखेला भारतरत्न लता मंगेशकर
(Bharat Ratna Lata Mangeshkar) यांच्या संकल्पनेतील पंडित दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालयासाठी (Pandit Dinanath Mangeshkar Music College) 100 कोटी रुपये मंजूर केले.
अडीच वर्षापूर्वी जी संकल्पना आमच्यासमोर आली, ती संकल्पना एकनाथ शिंदेंनी केवळ 2.5 महिन्यात प्रत्यक्षात उतरवली. म्हणूनच बुलेट ट्रेन पेक्षा (Bullet Train) त्यांचा फास्ट स्पीड आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Uday Samant | it seems that eknath shindes rally belong to balasaheb thackeray or not uday samant on shivsena

हे देखील वाचा :

Pune News | बिल्डरांच्या कार्यालयांतच सात हजारपेक्षा जास्त सदनिकांचे प्रथम विक्री करारनामे नोंद; ई-रजिस्ट्रेशन प्रणालीचा फायदा

Maharashtra Politics | शिंदे गट आणि निवडणूक आयोगाने ‘50 खोके एकदम ओके’ कार्यक्रम केला तर शिवसैनिक…, युवासेनेचा इशारा

Pune Crime | हडपसर आणि येरवडा परिसरात अवैध धंद्यांना ऊत? गुन्हे शाखेकडून मटक्याच्या अड्डयांवर छापे, 20 जण ताब्यात

Chandrasekhar Bawankule | मविआतील पक्षांना बावनकुळेंचा इशारा, म्हणाले – भविष्यात धक्क्यावर धक्के बसतील, बॉम्बस्फोटही दिसतील…

Related Posts