IMPIMP

Uday Samant | ‘जत तालुक्याच्या पाणीप्रश्नासोबतच शंभर हेक्टर जागेत एमआयडीसी उभारणार’ – उदय सामंत

by nagesh
Uday Samant | uday samant visits sangli jath 42 villages who warns to go into karnataka over water issue

सांगली : सरकारसत्ता ऑनलाईन – सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांनी त्यांचा पाणीप्रश्न सुटण्यासाठी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला आहे, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला होता. तो दावा महाराष्ट्र सरकारने फेटाळून लावला आहे. दुसरीकडे शिंदे फडणवीस सरकारनेदेखील या गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) सोमवारी जत तालुका दौऱ्यावर आले होते. यावेळी उदय सामंत (Uday Samant) यांनी जत तालुक्याचा पाणीप्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अनेक वर्षे सांगलीच्या जत तालुक्यातील लोक पाण्यापासून वंचित राहिले आहेत. मात्र, शिंदे फडणवीस सरकारच्या काळात लवकरच दुष्काळी जत तालुक्यात पाणी उपलब्ध करून दिल जाईल. तसेच पाण्याबरोबरच रोजगाराबाबत निर्णय घेण्यात येणार असून, त्यासाठी जत तालुक्यात एमआयडीसी सुरू करण्याबाबत, येत्या आठ ते दहा दिवसांत मुंबईमध्ये बैठक आयोजित केली आहे. शंभर हेक्टर जागेमध्ये एमआयडीसी उभी करण्याबाबत निर्णयदेखील घेतला जाईल, अशा घोषणा यावेळी उदय सामंत (Uday Samant) यांनी केल्या.

जत तालुक्यातील 42 गावांमधील ‘पाणी संघर्ष कृती समिती’ने शिंदे फडणवीस सरकारला निर्वाणीचा इशारा
दिला होता. महाराष्ट्र सरकारने सांगलीच्या जत तालुक्यातील 42 गावांना पाणी देण्यासाठी म्हैसाळ
विस्तारीत योजनेचे टेंडर 20 जानेवारीऐवजी 23 डिसेंबरच्या आत काढावे, अन्यथा 24 डिसेंबर 2022 रोजी
42 गावांमधील दुष्काळग्रस्तांची व्यापक बैठक घेऊन पुढच्या आंदोलनाची भूमिका ठरवून कर्नाटकमध्ये
जाण्याचा निर्णय घेतला जाईल, असा पवित्रा या गावांनी आणि कृषी समितीने घेतला होता.

Web Title :- Uday Samant | uday samant visits sangli jath 42 villages who warns to go into karnataka over water issue

हे देखील वाचा :

Pune Crime | टपरीचालकावर धारदार हत्याराने वार; कोंढव्यातील घटना

Pimpri Chinchwad-PCMC News | कार्यशाळेस दांडी मारणे पीसीएमसीतील पदाधिकाऱ्यांना पडले महागात; थेट कारवाईचा इशारा

Pune Crime | अक्षर सुंदर नसल्याने मुलाला बेदम मारहाण; शिक्षिकेवर FIR, पुण्यातील प्रकार

Related Posts