IMPIMP

Uday Samant | वाघोलीतील मूलभूत सुविधासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी – मंत्री उदय सामंत

by sachinsitapure

शिक्रापूर (सचिन धुमाळ) – Uday Samant | पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation – PMC) सामाविष्ट असलेल्या वाघोली गावातील (Problems In Wagholi) समस्यांसंदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. वाघोलीतील मूलभूत सुविधासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री उदय सामंत यांनी संबंधित सर्वच विभागाला दिले दिले. तसेच वाहतूक समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उभारणाऱ्या खासगी बससाठी मोकळी जागा उपलब्ध करून देण्याचे व ड्रेनेजसाठी येत्या आठ दिवसात रस्त्यांचे रेखांकन करून जागा देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार (MLA Ashok Pawar) यांच्या विनंतीनुसार उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली वाघोली गावातील विविध मूलभूत सुविधांसंदर्भात बैठक झाली. यावेळी पुणे महानगरपालिका, पुणे महानगर विकास प्राधिकरण, महावितरण पोलीस, पीएमपीएल आदींसह सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

वाघोलीमध्ये ड्रेनेज व्यवस्था करण्यासाठी रस्त्यांचे रेखांकन येत्या आठ दिवसांत करून देण्यात यावे. तसेच रस्ते, वाहनतळ संदर्भातील समस्यांसंदर्भात संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी. वाघोलीत रस्त्यांवरच खासगी बस थांबतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. ते टाळण्यासाठी या बसना रस्त्याशेजारील मोकळ्या जागेवर थांबविण्याची व्यवस्था करावी व त्यासंदर्भात पोलीस विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देशही मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिले.

Related Posts