IMPIMP

Udayanraje Bhonsle | भाजप खा. उदयनराजे यांनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

by nagesh
Udayanraje Bhonsle | BJP MP udayanraje bhosale met on NCP chief sharad pawar in delhi

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन जिल्हा बँकेची नुकतीच निवडणूक (Satara District Bank Election) झाली, त्यामुळे साताऱ्यात राजकीय रंग पहायला मिळत असताना भाजपचे राज्यसभेचे खासदार (BJP MP) उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) यांनी आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटतून आगामी काळात वेगळी राजकीय समीकरणं सातारा जिल्ह्यात (Satara district) पहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

शरद पवार यांचा नुकताच वाढदिवस झाला. सध्या उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) आणि शरद पवार हे दिल्लीत आहेत. उदयनराजे यांनी शरद पवार यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, असल्यातरी भविष्यात साताऱ्यात नवीन राजकीय समीकरणे उदयास येण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha election) उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे साताऱ्यात लोकसभेची पोटनिवडणूक झाली. या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील (Srinivas Patil) यांनी उदयनराजे भोसले यांचा पराभव केला. उदयनराजे यांनी राष्ट्रवादी सोडली असली तरी शरद पवार यांच्यावर असलेले प्रेम व जवळीक संपलेली नाही. मध्यंतरी शरद पवार आजारी होते, त्यावेळी त्यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. सध्या सातारा पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांची घेतलेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

Web Title :- Udayanraje Bhonsle | BJP MP udayanraje bhosale met on NCP chief sharad pawar in delhi

हे देखील वाचा :

Home Loan Tax Deduction | मार्च 2022 पर्यंत होमलोनवर मिळू शकते 5 लाख रुपयांपर्यंत टॅक्स सवलत, जाणून घ्या कशी

PM JanDhan Yojana | जनधन खातेधारकांना मोफत मिळतील 10,000 रुपये, तुम्ही सुद्धा तात्काळ उघडा आपले खाते

Pune Crime | कर्जासाठी प्रोसेसिंग फी घेऊन अनेकांची फसवणूक ! पतपेढी बंद करुन चेअरमनसह सर्व जण झाले फरार; पुण्याच्या कोंढव्यातील घटना

Related Posts