IMPIMP

Udayanraje Bhosale | ‘आम्ही कधी कोणाची घरं फोडली नाहीत’ – खासदार उदयनराजे

by nagesh
UdayanRaje Bhosale | no one received a call for the program at pratapgarh udayanraje bhosale clearly stated

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन साताऱ्यामध्ये (Satara) आरोप प्रत्यारोपांचा सामना चांगलाच रंगला आहे. शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosle) यांच्या टीकेला खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी सडेतोड उत्तर देत टीका केली (criticise) आहे. शिवेंद्रराजे यांनी काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्यावर टीका केली होती. यामध्ये उदयनराजेंची गँग म्हणजे नारळ फोडणारी गँग असा उल्लेख केला होता. यामुळे नाराज झालेल्या उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांना फटकारलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

आम्ही नारळ वाढवून लोकांची चांगली कामं करतो मात्र तुम्ही तर लोकांची घरच फोडायचं काम केल्याची जहरी टीका उदयनराजे भोसले (Udayanraje
Bhosale) यांनी शिवेंद्रराजे यांच्यावर केली आहे. जिल्ह्यातील लोकांनी विश्वास ठेवत तुमच्या बँकांमध्ये पैसे ठेवले मात्र त्यांना फसवत तुम्ही त्यांचीच घरं
फोडायची कामं केली. त्यामुळे लोकांची घर फोडण्यापेक्षा आमची नारळ फोडून लोकांची कामं करणारी गँग चांगली असल्याचे उदयनराजे यांनी म्हटले. सातारा शहराची (Satara city) जलसंजीवनी असलेल्या कास धरण (Kas dam) क्षेत्रातील विविध विकासकामांचा शुभारंभ आज उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवेंद्रराजे यांच्या टीकेचा समाचार घेतला.

उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, वय वाढल्यामुळे त्यांची बुद्धी सुद्धा लहान मुलांच्या बुद्धी पेक्षा कमी झाली आहे. त्यामुळेच त्यांनी आमच्यावर असा आरोप केला आहे. वैयक्तीक पातळीवर (individual leve) जावून टीका करणं हे माझ्या लेवलचं समजत नाही. मात्र, अत्यंत संकोचित वृत्तीची ही लोक आहेत. त्यांनी आरोप करताना विचार करायला पाहीजे. तसेच लोकांची आमच्याकडून अपेक्षा आहे. त्यामुळेच आम्ही कामाचे नारळ फोडतो असा टोलाही त्यांनी लगावला.

Web Title :- Udayanraje Bhosale | MP udayanraje bhosale takes dig on shivendraraje after he criticise

हे देखील वाचा :

Deepali Dhumal | ‘हे तर भाजपने केलेले गलिच्छ राजकारण’, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांची टीका

PM Kisan Scheme | मोठी बातमी ! ‘या’ लोकांच्या खात्यात येणार नाहीत 10 व्या हप्त्याचे पैसे, लवकर तपासून घ्या तुमचे नाव

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 84 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts