IMPIMP

Udayanraje Bhosale | उदयनराजे भोसले यांचा भाजपबाबत नरमाईचा सूर

by nagesh
Udayanraje Bhosale | udayanraje bhosale vs governor koshyari pm modi denied visit to udayanraje

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटविण्यासाठी भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)
यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील इतर खासदारांसह भोसले पंतप्रधानांना भेटले. पण, यावेळी भाजपबाबत उदयनराजे
भोसले (Udayanraje Bhosale) यांनी काहीसा नरमाईचा सूर घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सध्या त्यांच्यावर सगळीकडे चर्चा सुरू आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्याबाबत आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रकरणी शुक्रवारी उदयनराजे भोसलेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. मात्र, ही भेट वैयक्तिक न होता यावेळी भाजपचे इतरही खासदार उपस्थित होते. नवी दिल्ली येथे भाजप खासदार आणि उदयनराजेंसोबत (Udayanraje Bhosale) पंतप्रधान मोदींची बैठक पार पडली. त्यानंतर उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेत याविषयी भूमिका मांडली. भोसले म्हणाले, राज्यपालांना पदावरून हटवण्यासाठी आम्ही राष्ट्रपतींना पत्र पाठवले आहे. त्यानंतर राष्ट्रपती याबाबत गृहमंत्रालयाला पत्र पाठवतील. पंतप्रधान मोदींच्या कार्यालयातही आम्ही पत्र दिलेले आहे. राज्यपालांवर प्रक्रियेनुसार कारवाई होईल, अशी आम्हाला खात्री आहे.

मागील काही दिवस राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. विरोधी पक्षांनी राज्यपालांना पदावरून हटविण्याची मागणी केली होती.
तसेच भाजपच्या उदयनराजे भोसलेंनी ही मागणी लाऊन धरली होती.
त्यासाठी त्यांनी रायगड किल्ल्यावर एक सभादेखील घेतली होती.
त्यामुळे आगामी काळात राज्यपाल पायउतार होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Udayanraje Bhosale | udayanraje bhosale vs governor koshyari pm modi denied visit to udayanraje

हे देखील वाचा :

Sushma Andhare | ‘भाजप माझी हत्या करणार आहे का?’ – सुषमा अंधारे

SPPU News | पुणे विद्यापीठात भोजनासाठी विद्यार्थ्यांना जादा पैसे मोजावे लागणार

Pune News | ‘पर्यावरण आणि विकास या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून; जी २० परिषदेत यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न होतील’ – खासदार विनय सहस्त्रबुद्धे

Related Posts