IMPIMP

Uddhav Thackeray | फडणवीसांच्या ‘बॉम्ब’ फोडण्याचा इशारा; मुख्यमंत्र्यांची बारामतीत जोरदार फटकेबाजी

by nagesh
Uddhav Thackeray | baramati cm uddhav thackeray taunts opposition leader devendra fadnavis

बारामती : सरकारसत्ता ऑनलाइन नवाब मलिक (Nawab Malik) सातत्याने आरोप करत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील दिवाळीनंतर राज्यात बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस यांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज बारामती (Baramati) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी सध्या ड्रग्स प्रकरणावरुन सुरु असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर व इशाऱ्यावर जोरदार फटकेबाजी केली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

बारामतीमधील (Baramati) कृषी महाविद्यालयातील इनक्युबेशन सेंटरचे (Incubation Center) उद्घाटन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते झाले.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थिवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर इशाऱ्यावर भाष्य करताना म्हटले, दिवाळी सुरु झालेलीच आहे.
बॉम्ब फोडू. बॉम्ब फोडा पण धुर काढू नका, अशी कोपरखळी मुख्यमंत्र्यांनी हाणली.
कारण कोरोना अजून गेलेला नाही, त्या अनुषंगाने मी हे बोलतोय, अशी पुस्तीही त्यांनी जोडली

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुढे म्हणाले, राजकारणात एकमेकांचं पटत नाही. ठिकाय नाही पटत.
परंतु राजकारणात एकमेकांचं पटत नाही म्हणून अडथळे आणणे ही काय वृत्ती आहे. हे आपलं राजकारण असू शकत नाही.
ही आपली संस्कृती असू शकत नाही. तसे आपल्यावर संस्कार नाहीत. विकासकामाला पाठींबा जरी देत येत नसला तरी त्यात विघ्न तरी आणू नयेत.
आपल्याकडे विघ्नसंतोषी खूप आहेत. पण त्या विघ्नसंतोषींना नेमकं मिळतं काय? असा टोला त्यांनी लगावला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

नारायण राणेंना टोला

राजकारणात उबवणी केंद्र असायला पाहिजे. आम्हीही उबवणी केंद्रे निर्माण केली होती आणि नको ती अंडी उबवली.
आता त्याचं काय झालं ते तुम्ही पाहतच आहात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांचे नाव न घेता लगावला.

Web Title : Uddhav Thackeray | baramati cm uddhav thackeray taunts opposition leader devendra fadnavis

हे देखील वाचा :

Lok Sabha By-Election Results | दादरा-नगर हवेलीत भाजपला झटका ! शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांचा दणदणीत विजय

Pankaja Munde | ‘कोणताही शत्रू शुद्र नसतो, भाजप कार्यकर्त्यांच्या धमन्यांत संस्कार’ – पंकजा मुंडे

Sanjay Raut | भाजपाचे लोक काय जंगलात राहतात का? त्यांच्या सर्व मालमत्ता काय वैध आहेत का? – संजय राऊत

Related Posts