IMPIMP

Uddhav Thackeray | ‘प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

by nagesh
Uddhav Thackeray | CM uddhav thackeray slams opposition saying from new york to court everyone appreciates our work during corona pandemic

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनभाजपकडून (BJP) सतत शिवसेना (Shivsena), महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि मनपामुंबई वर (Mumbai Municipal Corporation) टीका करण्यात येत आहे. हाच मुद्दा पकडून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी टीका करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज बीएमसीच्या, (BMC) WhatsApp Chatbot सेवेचं लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, काम न करताना बोलणारे अनेक जण आहेत, असे म्हणत त्यांनी विरोधकांना फटकारलं. आपलं लोक कौतुक करत नसले तरी कोविडच्या (Covid-19) संकटात केलेल्या कामाचं न्यूयॉर्क (New York) पासून न्यायालयापर्यंत (Court) अनेकांनी कौतुक केलं आहे, असे म्हणत त्यांनी टीका करणाऱ्यांना टोला लगावला आहे.

जंगल मैं मोर नाचा किसने देखा

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, अनेकदा असं होतं की , कामं न करताही बोलणारे अनेकजण आहेत. काहीजण असे आहेत की कामं करतात पण बोलत नाहीत. मग त्याला म्हणतात जंगल मैं मोर नाचा किसने देखा, तर आपण संपूर्ण जगाला दाखवतोय की आम्ही काय करतो. आमचा कारभार पारदर्शक (Transparency) असून यामध्ये लपवण्यासारख काहीच नाही. जे आहे ते सर्व खुलं असल्याचे त्यांनी म्हटले.

प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही

कुणी तरी कौतुक कराव यासाठी काम करत नसलो तरी देखील कर्तव्य म्हणून आपल्याला ही कामे करावी लागतात.
उद्या कौतुक होईल याची माला अपेक्षा नाही, परंतु काही चुकले तर पालिकेवर खापर फोडायला मात्र सर्व मोकळे असतात.
जरा काही झाले तर नगरसेवक (Corporator) काय करतात ? महापौर (Mayor) काय करतात?
आयुक्त (Commissioner) काय करतात ? हे सर्व ठिक आहे.
पण तू काय करतोस ते सांग. स्वत:काही करायचं नाही आणि महापालिका काय करते असा प्रश्न विचारायचा.
प्रश्न विचारायला फार काही अकलेची गरज नसते असं मला वाटतं असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ज्यांना लोकांची काम करायची आहेत ते…

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या WhatsApp Chatbot सुविधेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, प्रशासकीय कारभाराबद्दल बोलतांना तिळगुळ दिल्याशिवाय काम होत नाही असा गैरसमज आहे.
मात्र, त्याला छेद देणारा हा आजचा उपक्रम आहे. माझी महापालिका, माझे सरकार, त्याचाशी माझा सुलभपणे संवाद झाला पाहिजे असे नागरिकांना वाटत असते. ती सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन देणे आजची बाब आहे.
मत मागताना झुकणारी, वाकणारी माणसं मत मिळाल्यानंतर ताठ होतात पण ज्यांना लोकांची काम करायची आहेत ते नेहमीच विनम्र असतात.
आपली मुंबई, माझी मुंबई ही देशातील एक नंबरची महापालिका आहे जी जनतेला 80 हून अधिक सुविधा घरबसल्या देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

Web Title : Uddhav Thackeray | CM uddhav thackeray slams opposition saying from new york to court everyone appreciates our work during corona pandemic

हे देखील वाचा :

CM Uddhav Thackeray | ‘अजित पवार यांच्यावर विश्वास नसेल तर आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सोपवा’; ‘या’ नेत्याची मागणी

Pune Crime | पुण्यात बिर्याणीवरुन पुन्हा वाद, जाणून घ्या नेमका प्रकार

LPG Cylinder Subsidy | प्रत्येक महिन्याला बँक अकाऊंटमध्ये एलपीजी सबसीडी जमा होतेय? असं करा चेक, जाणून घ्या

Shahapur Nagar Panchayat Election | शहापूर नगर पंचायत निवडणूक ! शिवसेना उमेदवाराच्या पराभवासाठी जादूटोणा; परिसरात उडाली खळबळ

Related Posts