IMPIMP

Uddhav Thackeray Group | ‘मातोश्री’चं किचन सांभाळते म्हणणार्‍या बाईला वैतागले म्हणत महिला नेत्याचा ठाकरेंना रामराम

by nagesh
Winter Session 2022 | maharashtra winter session 2022 shivsena uddhav balasaheb thackeray group ousted from list of table chairpersons

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या (Uddhav Thackeray Group) उपनेत्या पदाचा राजीनामा देत आशा मामेडी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची उपनेतेपदी निवड झाली होती. पण, त्यानंतरही आशा मामेडी यांनी पक्ष सोडला आहे. तुम्ही पक्ष (Uddhav Thackeray Group) का सोडला, या प्रश्नाचं उत्तर आशा मामेडी यांनी माध्यमांशी बोलताना दिले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

उद्धव ठाकरे गटातील (Uddhav Thackeray Group) महिला नेत्यांवर टीका करत मामेडी म्हणाल्या, ”मातोश्री’चं किचन माझ्या हातात आहे, असं म्हणणाऱ्या एका महिला नेत्याला कंटाळून मी पक्षाला रामराम ठोकला.’ मात्र, त्यामुळे आशा मामेडींचा रोख नेमका कोणाकडे होता, याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच, एकमेकातच असलेल्या स्पर्धेमुळे आपण चांगले नेते गमावत आहोत, असे म्हणत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्धव ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांना सुनावल्याचे कळते.

‘शिवसेना सोडण्याचं दु:ख होतंय, पण नाईलाजही आहे. शिवसेनेतील एका बाईमुळे मी पक्ष सोडला आहे.
ही गद्दार बाई आहे. मातोश्रीचं किचन माझ्या हातात आहे, असं ही बाई सर्व पदाधिकाऱ्यांना सांगत असते.
मग, रश्मी वहिनींच्या नावावर ही महिला काय काय करत असेल, याचा विचार न केलेलाच बरा.
ती महिला पदाधिकाऱ्यांकडून गिफ्ट मागते. पक्षातील अनेक महिला त्या दोघी जणींना कंटाळल्या आहेत,
‘ अशा शब्दात आशा मामेडी यांनी पक्ष का सोडला, याचे कारण सांगितले.

Web Title :- Uddhav Thackeray Group | shivsena leader asha mamedi joins cm eknath shinde faction balasahebanchi shivsena uddhav thackeray slams maharashtra politics

हे देखील वाचा :

Pune Crime | आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या कोरेगाव पार्क येथील ‘पब्लिक रेस्टॉरंट अँड बार’वर गुन्हे शाखेची कारवाई

यावेळी तपासा आपली Blood Sugar Level, मिळतो एकदम अचूक निकाल

Related Posts