IMPIMP

Uddhav Thackeray On Bhagat Singh Koshyari | उध्दव ठाकरेंचा महाराष्ट्र बंदचा इशारा, म्हणाले – ‘वृध्दाश्रमात जागा नसणार्‍यांना राज्यपाल नेमलं…’

by nagesh
 Uddhav Thackeray | 50 khoke slogan reached at jammu and kashmir says shivsena leader uddhav thackeray in thane

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन –  Uddhav Thackeray On Bhagat Singh Koshyari | ज्यांना वृद्धाश्रमात जागा नाही, त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर नेमले जाते. ज्या विचारांचे केंद्रात सरकार आहे, त्याच विचारांचे लोक राज्यावर नेमले जातात. त्यांची कुवत आणि पात्रता लक्षात घेतली जात नाही. त्यामुळे केंद्राने हे सँपल पुन्हा बोलावून घ्यावे अन्यथा, आम्ही आमच्या पद्धतीने याचा निषेध करु किंवा आंदोलन करु, असा इशारा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्राला दिला आहे. राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलत होते. (Uddhav Thackeray On Bhagat Singh Koshyari)

आम्ही केंद्राच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहोत. राज्यपालांना हटविण्यासाठी विविध पक्षातील लोकांनी एकत्र यावे. केंद्राने राज्यपालांना हटविले नाही, तर आम्ही महाराष्ट्र बंद करु, असा इशारा देखील यावेळी उद्धव ठाकरेंनी दिला आहे. राज्यपालांच्या सडक्या मेंदूच्या मागे कोणाचा हात आहे, याचा शोध घ्यावा लागेल. राज्यपाल हा नि:पक्ष असावा, तो सर्वसमावेशक असावा. राज्यात कोणताही पेचप्रसंग निर्माण झाल्यास राज्यपालांनी तो सोडवावा. पण, आपले राज्यपाल तसे काही न करता, मनाला येईल ते बोलत सुटतात. आता राज्यपालांच्या वक्तव्यांना गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. मागे देखील त्यांनी महाराष्ट्र आणि मुंबईचा असाच अपमान केला होता, असे यावेळी ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray On Bhagat Singh Koshyari)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

भाजपचा महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न सुरु आहे.
हा त्यांच्या पक्षाचा राजकीय कार्यक्रम आहे का, असा प्रश्न मला पडतो.
आता जर का राज्यपालांना हटविले गेले नाही, तर महाराष्ट्रद्रोह्यांचा विरोध करण्यासाठी आपण एकत्र येऊया.
वेळ आली तर महाराष्ट्र बंद ठेऊ. शांततेच्या मार्गाने महाराष्ट्र बंद करुया. पण राज्यपालांचा निषेध झालाच पाहिजे.
महाराष्ट्र हा लेचापेच्यांचा नाही, हे केंद्राला दाखवून देऊ.
त्यासाठी महाराष्ट्र बंदमध्ये सर्वांनी सामील व्हावे, असे यावेळी ठाकरे म्हणाले.

Web Title :- Uddhav Thackeray On Bhagat Singh Koshyari | shivsena uddhav thackeray on governar bhagatsingh koshyari contravercial statement on shivaji maharaj

हे देखील वाचा :

Pune Crime | वडिलांचा खून करणाऱ्या मुलाला बारामती सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाची विजयी सलामी; द गेम चेंजर्स संघाचा सलग दुसरा विजय

Pune News | बारामतीत नवविवाहितेबरोबर नियतीचा खेळ; लग्नाला आठवडा पण झाला नसताना नवऱ्याचा अकाली मृत्यू

Related Posts