IMPIMP

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात; म्हणाले – ‘शिवसेनेच्या नादी लागण्याची हिंमत केली तर…’

by nagesh
Maharashtra Politics | yuva sena sharad koli slams eknath shinde group and election commission over shivsena party symbol clashes

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनUddhav Thackeray | शिवसेनेने (Shivsena) मागील काही काळापासून पक्षातील बंडखोरांवर थेट हल्लाबोल करण्याचे सत्र अवलंबले आहेत. आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर (Shinde Group) जोरदार हल्लाबोल केला आहे. भगव्याला कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर त्याला दाखवून द्या, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटाचा उल्लेख पुन्हा गद्दार असा करत म्हटले की, माझा माझ्या शिवसैनिकांवर (Shivsainik) विश्वास आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाने नोंदणीसाठी एजंट लावले आहेत. जेवढी सदस्य संख्या ते करत आहेत, त्याच्या दहापट सदस्य संख्या मला हवी आहे. शिवसेनेची ताकत वाढली पाहिजे, केवळ गर्दी आणि फोटो नको. कारण फोटो घेऊन निवडणूक आयोगाकडे (Election Commission) गेलो, तर तुमचे सदस्य दाखवा असे ते म्हणतील. भविष्यात शिवसेनेच्या नादी लागण्याची कोणाची हिंमत व्हायला नको.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आपल्याला जिंकायचे आहे, मी कोणालाही कमी लेखत नाही.
प्रतिज्ञापत्र एवढी झाली पाहिजे की, भविष्यात शिवसेनेच्या नादी लागण्याची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे.
कोणालाही शिवसेनेचा भगवा हिसकावून देऊ नका. भगव्याला हात लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला दाखवून द्या,
असे म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या बंडखोर आमदारांना (Rebel MLA) इशारा दिला आहे.

Web Title : – Uddhav Thackeray | Shivsena chief uddhav thackeray slams cm eknath shinde group

हे देखील वाचा :

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या? 12 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता; शिंदे गटाच्या 4 आमदारांचा समावेश ?

Maharashtra Political Crisis | राजकारण करण्यापेक्षा विकास कामांवर लक्ष दिले असते तर.., भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला

8th Pay Commission | 8 वा वेतन आयोग नाहीच, नवीन फार्म्युलाने वाढणार केंद्रीय कर्मचार्‍यांचा पगार ! अर्थमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

Related Posts