IMPIMP

Uddhav Thackeray – Shivsena MP Sanjay Raut | उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेना खासदारांच्या बैठकीनंतर संजय राऊत नाराज ?; चर्चांना उधाण

by nagesh
MP Sanjay Raut | sanjay raut bail maharashtra political leaders first reaction after granted bail on patra chawl land scam case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनUddhav Thackeray – Shivsena MP Sanjay Raut | राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Election) भाजपाकडून (BJP) द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आणि विरोधकांकडून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) निवडणूक रिंगणात आहेत. सुरूवातीपासून शिवसेना विरोधकांच्या बाजूने असली तरी शिवसेनेचे काही खासदार भाजपा उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याच्या बाजूने आहेत. या निवडणुकीसंदर्भात आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेनेच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांच्या बैठकीत सर्वांचे मत जाणून घेण्यात आले. यावेळी खासदार संजय राऊत नाराज झाल्याचे वृत्त आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या अनेक खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या खासदारांनी यशवंत सिन्हा यांनाच पाठिंबा द्यावा, अशी शिवसेना नेते संजय राऊत यांची इच्छा आहे.

आज मातोश्रीवरील बैठकीत शिवसेनेच्या अनेक खासदारांनी भाजपाच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची भूमिका मांडल्याचे सांगण्यात येत आहे.
खासदारांच्या या भूमिकेवर संजय राऊत नाराज झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.
आता पक्षप्रमुख राष्ट्रपतीपदाच्या कोणत्या उमेदवाराला पाठींबा जाहीर करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Uddhav Thackeray – Shivsena MP Sanjay Raut)

संसदेतील शिवसेनेच्या 22 खासदारांपैकी केवळ 15 खासदार आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थितीत होते.
राज्यसभेतील संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी तर लोकसभेतील 19 पैकी अरविंद सावंत, गजानन कीर्तीकर, विनायक राऊत,
श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, हेमंत गोडसे, राहुल शेवाळे, प्रतापराव देशमुख, सदाशिव लोखंडे, राजन विचारे, राजेंद्र गावित,
ओमराजे निंबाळकर आदी 12 खासदार उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे, भावना गवळी यांच्यासह संजय जाधव, संजय मंडलिक, हेमंत पाटील,
कृपाल तुमाने आणि कलाबेन डेलकर हे खासदार मातोश्रीवरील आजच्या बैठकीला अनुपस्थित होते.
राज्यसभेतील शिवसेनेचे खासदार अनिल देसाई दिल्लीत असल्याने बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Uddhav Thackeray – Shivsena MP Sanjay Raut | after the meeting of shiv sena mps the discussion has started that mp sanjay raut is upset

हे देखील वाचा :

Dengue Patients-Pune Corona | शहरात कोरोनासोबतच डेंग्युच्या रुग्णांच्या संख्येत वाढ ! डेंग्यु रोखण्यसाठी नागरिकांनी स्वत:च्या घरापासून काळजी घ्यावी; महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आवाहन

Pune ACB Trap On PMC Officers | 40 हजाराच्या लाच प्रकरणी पुणे मनपाच्या उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्याला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

Raja Mane | राजा माने यांना सुधारककार आगरकर राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

Related Posts