IMPIMP

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा राणेंवर पलटवार, म्हणाले – ‘सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला, कोणी म्हणेल मीच बांधला’ (व्हिडीओ)

by nagesh
Uddhav Thackeray | sindhudurg was built by chhatrapati shivaji maharaj who says i built it uddhav thackerays retaliation against rane

सिंधुदुर्ग :  सरकारसत्ता ऑनलाइन– सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचे (Chipi Airport Inauguration) उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी या दोन राजकीय कट्टर विरोधकांमध्ये शाब्दिक टोलेबाजी पहायला मिळाली. 16 वर्षानंतर हे दोन दिग्गज नेते एका व्यासपीठावर आले होते. त्यामुळे हे दोन नेते काय बोलणार याकडे सार्वांच्या
नजरा लागल्या होत्या. नारायण राणे यांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाषण केले. आपल्या भाषणातून त्यांनी
नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिल्याचे दिसून आले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

यावेळी मुख्यमंत्र्यांनी जोरदार टोलेबाजी केली. जे काही आधी बोलून गेले आहेत विकासाच्या गोष्टी त्या मी पुन्हा सांगणार नाही. पण जेव्हा मी एरियल
फोटोग्राफी (Aerial photography) करत होतो, महाराजांचे किल्ले, आता किल्ले म्हणजे… माझा समज असा आहे की, निदान सिंधुदुर्ग किल्लातरी
(Sindhudurg Fort) छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) बांधला आहे. नाही कोणतरी बोलेल मीच बांधला, असा
पलटवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला.

मुख्यमंत्र्यांकडून ज्योतिरादित्य यांचे अभिनंदन

मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले, आजचा क्षण मला वाटतं आदळ आपट करण्याचा नसून आनंद व्यक्त करण्याचा आहे. ज्योतिरादित्यजी (Jyotiraditya Scindia) मी तुमचं खास अभिनंदन करतो. कारण तुम्ही इतकं लांब राहून देखील मराठी मातीचे संस्कार विसरला नाही. माती एक संस्कार असतो, मातेचा एक संस्कार असतो आणि मातीच्या वेदना काही वेळेला मातीच जाणते.

आता बाभळीची झालं उगवली तर…

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, अनेक झाडं उगवतात त्यात काही बाभळीचे असतात, काही आंब्याचे असतात आता बाभळीची झाडं उगवली तर माती म्हणणार मी काय करु? जोपासावे लागते. माझ्यासाठी हा सौभाग्याचा दिवस आहे. कारण शिवसेना (Shivsena) आणि कोकण (Konkan) हे नातं मी काय तुम्हाला सांगायला नको.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

आजपर्यंत अनेकजण येऊन गेले

पर्यटन… पर्यटन… आजपर्यंत अनेकजण येऊन गेले होते की आम्ही कोकणचा कॅलिफोर्निया (California) करु आणि तेव्हा शिवसेना प्रमुख म्हणाले होते की, कॅलिफोर्नियाला अभिमान वाटेल असं कोकण मी उभं करेन. आज पर्यटनाला उद्योगाचा दर्जा आपण दिलेला आहे. उर्वरित गोष्टी आदित्यने (Aditya Thackeray) व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. पाठांतर करुन बोलणं वगेळं आणि आत्मसात करुन तळमळीने बोलणं वेगळं. मळमळीने बोलणं आणखी वेगळं असतं. त्याबद्दल मी नंतर बोलेन, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

Web Title : Uddhav Thackeray | sindhudurg was built by chhatrapati shivaji maharaj who says i built it uddhav thackerays retaliation against rane

Web Title :

Mumbai Cruise Drug Case | नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट ! म्हणाले – ‘भाजप नेत्याचा तो मेहुणा कोण?’

Pune News | सन्मान स्त्री शक्तीचा ! कर्तृत्ववान महिलांचा वडगावशेरी भाजपकडून सन्मान

Rakesh Jhunjhunwala | नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर पत्रकाराने विचारला प्रश्न, यावर राकेश झुनझुनवाला यांनी दिले हे उत्तर (व्हिडीओ)

Related Posts