IMPIMP

Uddhav Thackeray On Eknath Shinde Group | पुण्यातील ‘त्या’ घटनेवरून ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटाची अक्कलच काढली; ‘हे अकलेचे शत्रू शिवसेनेला हिंदुत्व आणि….’

by nagesh
Nagpur Politics | maharashtra both uddhav thackeray group and eknath shinde group have taken two same activists in nagpur

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – काँग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यावर राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले आहे. त्यावर भाजप शिवसेना (Shivsena) आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) धारेवर धरत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी पुण्यातील एका घटनेवरुन भाजप (BJP) आणि शिंदे गटावर (Eknath Shinde Group) निशाणा साधला आहे. हे अकलेचे शत्रू शिवसेनेला हिंदुत्व शिकवणार? असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले आहेत. (Uddhav Thackeray On Eknath Shinde Group)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

भाजप आणि शिंदे गट हे नकली सावरकरप्रेमी आहेत, असे सामनातून म्हंटले आहे. भारतीय जनता पक्ष (BJP) आणि त्यांच्या शिंदे गटाचे वीर सावरकर प्रेम अचानक उफाळून आले. पण, त्यांना ही अशी उफाळण्याची संधी राहुल गांधी यांनी दिली. ‘भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात येताच राहुल गांधी यांचे भव्य स्वागत झाले. त्यांच्या यात्रेला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. त्यांच्या यात्रेसाठी जनसमुदाय जमू लागला आहे. पण गांधींना यावेळी सावरकरांचा विषय काढण्याची गरज नव्हती. त्यामुळे राहुल गांधी यांनी शिंदे गट आणि भाजपच्या हातात आयते कोलीत दिले आहे, असे सामनाच्या अग्रलेखात म्हंटले आहे. (Uddhav Thackeray On Eknath Shinde Group)

सावरकरांच्या हिंदू महासभेवर या लोकांनी आगपाखड केली. त्यामुळे सावरकरांचे नाव घेऊन राजकारण करण्याचे उद्योग त्यांनी बंद करावेत. शिंदे गटाचे लोक तर राहुल गांधी समजून वीर सावरकरांनाच रस्त्यावर जोडे मारीत आहेत. असे हे अकलेचे शत्रू शिवसेनेला हिंदुत्व आणि सावरकरांचे विचार समजवायला निघाले आहेत, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली. आहे.

राहुल गांधी यांच्या निषेधार्थ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सारस बागेजवळील (Sarasbaug, Pune)
सावरकरांच्या (VD Savarkar) पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आंदोलन केले.
यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या निषेधासाठी फ्लेक्स तयार करुन आणले होते.
यावेळी एक महिला राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारण्याऐवजी सावरकरांच्या फोटोला जोडा मारणार होती.
त्यावेळी त्या महिलेला तेथील उपस्थितांनी थांबविले.
या प्रकाराचे चित्रिकरण गेले दोन दिवस समाज माध्यामांवर प्रसारीत होत आहे.
त्यावरुन शिंदे यांच्या कार्यकर्त्यांचे सावरकर प्रेम दिसत आहे.
त्यावरुन शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून शिंदे गट आणि भाजप यांच्यावर निशाणा साधला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Uddhav Thackeray | uddhav thackeray slams cm group over incidence in pune where eknath shinde supporters mistakenly tried to hit veer savarkar photo instead of rahul gandhi

हे देखील वाचा :

Pune Crime | देवेंद्र फडणवीस यांची ट्विटरवर बदनामी करणार्‍यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune ACB Trap | पॅरोलवर असलेल्या कैद्याकडून लाच घेणे पडले महागात, येरवडा कारागृहातील हवालदारासह महिलेला अटक

Fifa Football World Cup 2022 | नको ‘त्या’ कारणांसाठी चर्चेत असलेला फुटबॉल विश्वचषक नव्या वादात; आयोजक करणार दारूबंदी?

Related Posts