IMPIMP

Uddhav Thackeray | ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याशी काडीमात्र संबंध नाही, त्यांच स्वातंत्र्यवीरांबद्दलचे प्रेम हास्यास्पद; उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना चोख प्रतिउत्तर

by nagesh
Uddhav Thackeray | uddhav thackeray slams devendra fadnavis on veer savarkar controversy

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) आल्यापासून त्यांच्यात दररोज कोणत्याना कोणत्या मुद्द्यावरून वाद रंगत आहे. त्यात काल राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची टीका करून महाराष्ट्रात नवीन राजकीय वादळ सुरु केली आहे. शिवसेना महाविकास आघाडी मध्ये काँग्रेसशी युतीत आहे. त्यामुळे यावर शिवसेनेची भूमिका काय घेणार हे जाणून घेण्यासाठी भाजप एक प्रकारे उत्सुक होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्याला आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) उत्तर दिले आहे. ‘ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याशी काडीमात्र संबंध नाही, अशा मातृसंस्थेच्या मुलांनी किंवा पिल्लांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल प्रेम व्यक्त करणं हे हास्यास्पद आहे”, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

“बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (Swatantryaveer Savarkar) अभिमान होता. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल कोणी चुकीचं बोललं, तर त्याला जशास तसं उत्तर मिळत होतं. मात्र, ज्या सावरकरांबद्दल राहुल गांधी (Rahul Gandhi) इतकं नीच बोलतात, त्यांच्या गळ्यात गळा टाकून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) पदयात्रा करतात, याचं वाईट वाटतं,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आदित्य ठाकरेंवर घणाघाती टीका केली. आज मुंबईत शिंदे गटाकडून (Shinde Group) ‘वारसा विचारांचा परिसंवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते.

“देवेंद्र फडणवीसांनी हा मुद्दा उपस्थित केला, याचा मला आनंद वाटला. मी अत्यंत स्पष्टपणे सांगतोय,
की स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आमच्या मनात प्रचंड आदर, प्रेम आणि श्रद्धा आहेच. ती कोणीही पुसू शकणार नाही. पण सावरकरांबद्दल प्रश्न कुणी विचारावा? ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याशी काडीमात्र संबंध नाही, अशा मातृसंस्थेच्या मुलांनी किंवा पिल्लांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल प्रेम व्यक्त करणं हे हास्यास्पद आहे”, असे उत्तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “ते म्हणतील तुम्ही कुठे होतात तेव्हा स्वातंत्र्यलढ्यात? आम्ही तेव्हा नव्हतोच.
पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) १०० वर्ष होणार आहेत, तो मात्र तेव्हा होता.
पण तरीही स्वातंत्र्यलढ्यापासून ते चार हात लांब होते. त्यांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल बोलण्याचा प्रयत्न करू नये.
त्यांना तो अधिकार नाही. सावरकरांनी ज्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला, ते स्वातंत्र्य धोक्यात आल्यानंतर ते
अबाधित राखण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. म्हणून हा पाचकळपणा त्यांनी आता बंद करावा.
आधी आपल्या मातृसंस्थेचं स्वातंत्र्यलढ्यातलं योगदान काय आहे, ते सांगावं.
आणि मग आम्हाला प्रश्न विचारावेत”, अशा कडक शब्दांत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Uddhav Thackeray | uddhav thackeray slams devendra fadnavis on veer savarkar controversy

हे देखील वाचा :

Gangster Chhota Rajan | पुराव्यांअभावी कुख्यात गुंड छोटा राजनसह चौघांची निर्दोष मुक्तता

Nysa Devgan | न्यासा देवगणने ‘अशाप्रकारे’ केले तिचे ट्रान्सफॉर्मेशन, काजोलने सांगितले ‘हे’ ब्युटी सीक्रेट

Actress Jasmine Dhunna | वीराणा चित्रपटात ‘डायन’ बनून गायब झाली ही अभिनेत्री, पण तिच्या सौंदर्यावर फिदा होता अंडरवर्ल्ड डॉन

Related Posts