IMPIMP

Uddhav Thackeray | शिवसेना संपत चाललीय म्हणणारे भाजपाध्यक्ष जेपी नड्डांना उद्धव ठाकरेंचे सणसणीत प्रत्युत्तर, म्हणाले…

by nagesh
Uddhav Thackeray | uddhav thackerays response to bjp president jp nadda saying that shivsena is ending said

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर आमदार (MLA), खासदार (MP), नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात (Shinde Group) दाखल होत आहेत. त्यामुळे हा शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP National President J.P. Nadda) यांनी घराणेशाहीमुळे शिवसेनेसारखे प्रादेशिक पक्ष संपत जातील आणि एकटा भाजप उरेल असे वक्तव्य केले होते. नड्डा यांच्या या विधानाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाच्या अध्यक्षांनी शिवसेना हा संपत चाललेला पक्ष आहे, असं म्हटलंय. पण त्यांना माहिती नाही की, शिवसेनेनं अशी आव्हानं पायदळी तुडवत त्यावर झेंडा रोवलाय, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आज मातोश्रीवर (Matoshree) जमलेल्या शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून रोज लढाया सुरु आहेत. आपली लढाई दोन तीन पातळीवर सुरु आहे. एक रस्त्यावरील लढाई आहे, त्यात आपण कमी पडणार नाही. दुसरी लढाई कोर्टात (Court) सुरु आहे. आणि तिसरी लढाई ही तेवढीच महत्त्वाची आहे. ती लढाई म्हणजे कागदाची. शपथपत्र गोळा करा. हा विषय खूप गंभीर आहे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, कायद्याची लढाई सुरु आहे. ती लढाई आपले वकील किल्ला लढवत आहेत.
माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. आजपर्यंत शिवसेनेला फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले.
परंतु आता शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. हे मी आधीच बोललो होतो की, हा प्रयत्न शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न आहे.
परवा भाजप अध्यक्ष यांनी ते बोलून दाखवले. शिवसेना हा संपत चाललेला पक्ष आहे, असे ते म्हणतात.
पण त्यांना माहिती नाही की, शिवसेनेनं अशी आव्हानं पायदळी तुडवत त्यावर झेंडा रोवला आहे, असा टोला त्यांनी लगावला.

भाजपला इशारा देताना उद्धव ठाकरे म्हणाले, ठीक आहे राजकारणात हार जीत होत असते.
कधी कोण जिंकत असतं, तर कुणी पराभूत होत असतो. पण कुणी कुणाला संपवण्याची भाषा आपल्या देशात झाली नव्हती.
दुसऱ्याला संपवण्याची भाषा करतो तो संपतो, असा इशारा ठाकरे यांनी दिला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : –  Uddhav Thackeray | uddhav thackerays response to bjp president jp nadda saying that shivsena is ending said

हे देखील वाचा :

Pune Crime | 10 हजारांचा हप्ता न दिल्याने हॉटेल चालकावर तलवारीने वार करुन केली तोडफोड

Maharashtra Political Crisis | उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व अमान्य, शिंदे गटाची सुप्रीम कोर्टात माहिती

Pune Crime | मुलांना फायर गेमची डायमंड मेंबरशिपच्या बहाण्याने वडिलांचा पासवर्ड चोरुन सव्वा लाखांना घातला गंडा

Related Posts