IMPIMP

Pune Corporation | पुणे महापालिकेत समाविष्ट गावांच्या विकासाला महापालिकेचे प्राधान्य – महापौर मुरलीधर मोहोळ

350 कोटींच्या प्रकल्पाचे महापौरांच्या हस्ते भूमिपूजन; 4 वर्षात पूर्ण होणार प्रकल्प

by nagesh
Pune Corporation | Pune Municipal Corporation's priority for the development of villages included in Pune Municipal Corporation - Mayor Murlidhar Mohol

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे महापालिकेत (Pune Corporation) ‘समाविष्ट गावांना मुलभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी पुणे महापालिका कटिबद्ध असून त्यातीलच महत्त्वाचा भाग असणाऱ्या मल:निसारण व्यवस्थेचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. या अंतर्गत समाविष्ट ११ गावांसाठी मैला वाहिनी आणि मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (Sewage Treatment Plant) साकारण्यात येत असून समाविष्ट गावांमध्ये पायाभूत सुविधा सक्षमपणे उभ्या करण्यास महापालिकेचे (Pune Corporation) प्राधान्य असेल, असे प्रतिपादन महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी केले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महापौर मोहोळ यांच्या हस्ते नऱ्हे येथे ३५० कोटींच्या मलवाहिनी आणि मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी महापौर मोहोळ बोलत होते. यावेळी उपमहापौर सुनीता वाडेकर (deputy mayor sunita wadekar), खडकवासल्याचे आमदार भीमराव लतापकीर (MLA Bhimrao Tapkir), स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने (pmc standing committee chairman hemant rasne), विरोधी पक्षनेत्या अश्विनी पोकळे, गणेश ढोरे, हरिदास चरवड, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार (pmc additional commissioner kunal khemnar), अधीक्षक अभियंता जगदीश खानोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

महापौर मोहोळ पुढे बोलताना म्हणाले, ‘समाविष्ट ११ गावांमध्ये शिवणे, संपूर्ण उत्तमनगर, धायरी, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, उंड्री, उरुळी देवाची, फुरसुंगी, मुंढवा (उर्वरित केशवनगर), हडपसर (संपूर्ण साडेसतरानळी), लोहगाव आदी गावांचा समावेश असून मल:निसारण व्यवस्थेचा मास्टर प्लॅन या सर्व गावांसाठी महत्त्वाचा भाग ठरणार आहे’ (Pune Corporation)

‘समाविष्ट गावांसाठीची ही कामे ४ वर्षात राबवण्याचे नियोजन केले असून
या अंतर्गत ११ गावांमध्ये १८२ किलोमीटर लांबीची मलवाहिनी विकसित करण्यात येत आहे.
तसेच मुंढवा येथे १२ एमएलडी क्षमतेचा आणि मांजरी बुद्रुक येथे ९३.५ एमएलडी क्षमतेचा
असे दोन मैलापाणी शुद्धीकरण केंद्र बांधण्यात येत आहेत.
यात मांजरी प्रकल्पास देवाची उरुळी, उंड्री, फुरसुंगी, मांजरी तर मुंढवा प्रकल्पास केशवनगर,
साडेसतरा नळी, हडपसर (उर्वरित) हा भाग जोडला जाणार आहे’,
असेही महापौर मोहोळ म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

‘समाविष्ट गावांचा विकास करताना तो नियोजनबद्ध आणि भविष्याच्या गरजा लक्षात घेऊनच करत आहोत.
म्हणूनच मलनिसरण व्यवस्थेचा आधी मास्टर प्लॅन तयार केला गेला आहे.
सदरील कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचेदेखील नियोजन केले आहे.
या मास्टर प्लॅनमधील कामांना ‘७२ ब’ अंतर्गत मान्यताही दिली आहे, असेही महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले.

Web Title :- Pune Corporation | Pune Municipal Corporation’s priority for the development of villages included in Pune Municipal Corporation – Mayor Murlidhar Mohol

हे देखील वाचा :

Ayushman Card-Omicron | ओमिक्रॉनचा कहर झपाट्याने वाढला ! संक्रमित झाल्यास आयुष्मान कार्डद्वारे मोफत उपचार होणार का? जाणून घ्या याच्याशी संबंधी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

PM Narendra Modi | लॉकडाऊनची शक्यता नाकारली ! ‘पॅनिक होऊ नका, पण काळजी घ्या’ – PM मोदींचं आवाहन

Pune Coep Jumbo Covid Centre | सीओईपी जम्बो कोरोना स्पेशालिटी हॉस्पीटल सुरू करण्याच्या तयारीत पण…महापालिकेने जुनीच बिले न दिल्याने संस्थां काम करणार का याबाबत साशंकता

Related Posts