IMPIMP

Universal Pension System | सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! वाढू शकते निवृत्तीचे वय अन् पेन्शनची रक्कम, मोदी सरकार करतंय विचार, जाणून घ्या

by nagesh
Universal Pension System | pms economic advisory committee recommend universal pension sys higher retirement age boost to incomesecurity marathi news

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– Universal Pension System | मोदी सरकार कर्मचार्‍यांना लवकरच खुशखबर देऊ शकते. कर्मचार्‍यांचे निवृत्तीचे वय (Retirement Age) आणि पेन्शनची (Pension) रक्कम वाढवण्यावर मोदी सरकार (Modi Government) विचार करत आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीकडून (PMs Economic Advisory Committee) हा प्रस्ताव (Universal Pension System) पाठवण्यात आला आहे. यामध्ये देशात लोकांचे काम करण्याची वयोमर्यादा वाढवण्याबाबत म्हटले आहे. सोबतच या समितीने म्हटले आहे की, देशात युनिव्हर्सल पेन्शन सिस्टम सुद्धा सुरू केली पाहिजे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा

समितीच्या रिपोर्टनुसार, या सूचनेंतर्गत कर्मचार्‍यांना दरमहिन्याला किमान 2000 रुपयांची पेन्शन (Universal Pension System) दिली पाहिजे.
आर्थिक सल्लागार समितीने देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी चांगली व्यवस्था करण्याची शिफारस केली आहे.

स्किल डेव्हलपमेंट आवश्यक

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जर कामकाजाच्या वयाची लोकसंख्या वाढवायची असेल तर यासाठी सेवानिवृत्तीचे वय वाढवणे अतिशय गरजेचे आहे.
सामाजिक सुरक्षा प्रणालीवरील दबाव कमी करण्यासाठी असे करता येऊ शकते.
रिपोर्टमध्ये 50 वर्षावरील व्यक्तींसाठी सुद्धा स्किल डेव्हलपमेंटबाबत म्हटले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

सरकारांनी बनवावे धोरण

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, केंद्र आणि राज्य सरकारांनी (State Government) अशी धोरणे बनवावी ज्याद्वारे कौशल्य विकास करता येऊ शकतो.
या प्रयत्नात असंघटित क्षेत्र, दुर्गम परिसरात राहणारे लोक, रिफ्यूजी, प्रवाशांचा सुद्धा समावेश करता येऊ शकतो.
ज्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्याचे साधन नसते, परंतु त्यांनी प्रशिक्षित होणे गरचेचे आहे.

32 कोटी ज्येष्ठ नागरिक

वर्ल्ड पॉप्युलेशन प्रोस्पेक्टस 2019 (World Population Prospects 2019) नुसार, 2050 पर्यंत भारतात सुमारे 32 कोटी ज्येष्ठ नागरिक होतील.
लोकसंख्येच्या सुमारे 19.5 टक्के व्यक्ती सेवानिवृत्तीच्या कॅटेगरीत जातील.
2019 मध्ये भारताच्या लोकसंख्येच्या सुमारे 10 टक्के किंवा 14 कोटी लोक ज्येष्ठ नागरीक कॅटेगरीत आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Universal Pension System | pms economic advisory committee recommend universal pension sys higher retirement age boost to incomesecurity marathi news

हे देखील वाचा :

LPG Subsidy | खुशखबर ! स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर मिळतेय सबसिडी, ग्राहकांच्या अकाऊंटमध्ये 237 रुपये ट्रान्सफर, ‘इथं’ तपासून पहा?

Pune Crime | पिंपरीमध्ये गांजाचा मोठा साठा जप्त

Nana Patole | भाजपला गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का?, नाना पटोलेंचा संतप्त सवाल

Related Posts