IMPIMP

UP Assembly Election 2022 | निवडणूक आयोगाचा ‘सपा’ला झटका; कोरोना नियम उल्लंघनप्रकरणी अडीच हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा

by nagesh
UP Assembly Election 2022 | election 2022 violation corona rules sp rally fir against 2500 workers sho gautam palli suspend

लखनऊ : वृत्तसंस्था UP Assembly Election 2022 | उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा (UP Assembly Election 2022) प्रचार शिगेला
पोहोचला आहे. कोरोनाचे संकट (Coronavirus) असले तरी विविध माध्यमातून सर्वच पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणूक
आयोगाने (Election Commission) निवडणूक कार्यक्रम जाहीर करतानाच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही नियमही घालून दिले होते. रॅली, रोड
शो आणि सभांना 15 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली होती. मात्र तरीही, समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) व्हर्चुअल रॅली आयोजित केलीच
पण त्यामध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन ही झाले. त्यामुळे निवडणूक आयोगाने कठोर पावले उचलत रॅलीत सहभागी झालेल्या 2500 कार्यकर्त्यांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. त्याच बरोबर निवडणूक आयोगाने गौतमपल्ली एसएचओ विरोधात निलंबनाच्या (Suspended) कारवाईचे आदेश दिले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

निवडणुकीच्या धामधुमीतच भाजपच्या (BJP) अनेक नेत्यांनी दुसऱ्या पक्षाचा झेंडा हातात घेण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya), धरम सिंह सैनी (Dharam Singh Saini) यांच्यासह अनेक नेत्यांनी सपामध्ये प्रवेश केला. या प्रसंगी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्याला अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते. या वेळी झालेल्या ‘व्हर्च्युअल रॅली’मध्ये शेकडो कार्ययकर्ते सहभागी झाले होते. महत्त्वाचे म्हणजे या रॅलीत कोरोना नियंमाचे उल्लंघनही करण्यात आले. त्यामुळे लखनऊ पोलिसांनी (Lucknow Police) समाजवादी पक्षाच्या नेत्यांविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (UP Assembly Election 2022)

प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन –

एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजवादी पक्षाच्या कार्यालयात झालेल्या मेळाव्यात प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन आणि कोरोना कायद्याचे उल्लंघन करण्यात आले त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर लखनऊ जिल्हा प्रशासनातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार प्रशासनातील अधिकारी आणि पोलीस अधिकारी कार्यक्रम स्थळी गेले होते. प्रथमदर्शी कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले असून तपास सुरू आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : UP Assembly Election 2022 | election 2022 violation corona rules sp rally fir against 2500 workers sho gautam palli suspend

हे देखील वाचा :

Sara Sachin Tendulkar | सारा तेंडुलकरने व्यक्त केल्या तिच्या वेदना, म्हणाली – ‘आजकाल ‘या’ गोष्टीला मिस करतेय’

Pune English Medium School | इंग्लिश मीडियम शाळा 15 फेब्रुवारीआधीच सुरू करणार

Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती; कोरोनामुळे बंद असलेल्या ‘प्रगती एक्स्प्रेस’, ‘पुणे-भुसावळ एक्स्प्रेस’ रेल्वेगाड्या पुन्हा धावणार

Related Posts