IMPIMP

UPI 123Pay | ‘हे’ नंबर मोठ्या कामाचे, इंटरनेटची गरज नाही; एका कॉलने करू शकता यूपीआय पेमेंट

by nagesh
UPI 123Pay | upi 123pay remember these numbers internet is not necessary you can make upi payment with one call

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाUPI 123Pay | युनिफाईड पेमेंट इंटरफेस Unified Payments Interface (UPI) हा अलिकडच्या काही वर्षांत सर्वाधिक
वापरला जाणारा डिजिटल पेमेंट मोड म्हणून उदयास आला आहे. डिजिटल पेमेंटसाठी यूपीआय सारखी सुविधा तुम्हाला तुमच्या घरातून सहज पैसे
ट्रान्सफर करू देते. (UPI 123Pay)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

यासाठी, तुम्हाला Paytm, फोनपे (PhonePe) , भीम, गुगल पे (Google Pay) इत्यादीसारख्या यूपीआय सपोर्टिंग अ‍ॅप्सची आवश्यकता असते. पण
तुम्हाला माहिती आहे का की आता तुम्ही तुमच्या फीचर फोनच्या मदतीने इंटरनेट न वापरता कोणालाही पैसे ट्रान्सफर करू शकता.

फीचर फोनवरून इंटरनेटशिवाय करा यूपीआय पेमेंट
हजारो फीचर फोन वापरकर्त्यांना डिजिटल पेमेंट सिस्टममध्ये आणण्यासाठी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने अलीकडे यूपीआयचे नवीन व्हर्जन UPI 123Pay सादर केले आहे. UPI 123Pay सह, आता ज्या वापरकर्त्यांकडे इंटरनेटसह स्मार्टफोन नाही ते देखील यूपीआय व्यवहार करू शकतील.

या सुविधेद्वारे फीचर फोन वापरकर्ते 4 प्रकारे यूपीआय व्यवहार करू शकतात. वापरकर्ते इंटरएक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स (IVR), अ‍ॅप आधारित पेमेंट, प्रॉक्सिमिटी साउंड आधारित पेमेंट आणि मिस्ड कॉलद्वारे पेमेंट करू शकतात.

सध्या येथे IVR द्वारे UPI पेमेंटबद्दल बोलू. येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की ही सुविधा सध्या फक्त काही बँकांच्या ग्राहकांसाठी सुरू आहे.

सर्वप्रथम यूपीआय आयडी बनवावा लागेल
सर्वप्रथम, तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवरून आयव्हीआर नंबर 080 4516 3666 / 6366 200 200 / 080 4516 3581 डायल करा. सूचनांचे अनुसरण करत यूपीआय आयडी तयार करा आणि यूपीआय पिन तयार करा.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आयव्हीआरद्वारे UPI 123 Pay कसे वापरावे ?

तुमच्या फोनवरून आयव्हीआर नंबर 080 4516 3666 / 6366 200 200 / 080 4516 3581 डायल करा.
आता तुमची भाषा निवडा.
यानंतर यूपीआयशी संबंधित बँक निवडा.
पुष्टी करण्यासाठी ’1’ आकडा दाबा.
पैसे पाठवण्यासाठी ’1’ आकडा दाबा.
ज्या व्यक्तीला तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत त्यांचा मोबाईल नंबर टाका.
तपशीलांची खात्री करा.
आता रक्कम टाका.
शेवटी यूपीआय पिन टाकून पैसे हस्तांतरण ऑथराइज्ड करा.

Web Title :- UPI 123Pay | upi 123pay remember these numbers internet is not necessary you can make upi payment with one call

हे देखील वाचा :

Irsal – Official Trailer | आपल्या ‘ईर्षे’साठी अल्पवयीनांना का धरता वेठीस ! ‘इर्सल’मध्ये ‘अल्पवयीन’च्या हातात पिस्तुल देऊन साधायचे काय?

Pune Pimpri Crime | रस्त्यावर पट्टे मारणाऱ्या 5 कामगारांना ट्रकची धडक, एकाचा मृत्यू 4 गंभीर जखमी

Pune Crime | पुण्यातील घटनेने अजब खळबळ ! ‘एका मुलाचा मृत्यू, अंत्यसंस्कार मात्र दोघांवर?; पोलिसही चक्रावले

Related Posts