IMPIMP

Uric Acid | एक्सपर्टकडून जाणून घ्या, यूरिक अ‍ॅसिड वाढल्यास काय खावे आणि काय नाही

by nagesh
Uric Acid | health diet tips how to control uric acid

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Uric Acid | बदलत्या जीवनशैलीत लोक वेळेवर झोपत नाहीत, वेळेवर जेवत नाहीत, कसलाही व्यायाम करत नाहीत. याचा परिणाम म्हणजे वयाच्या ३०-४० व्या वर्षीच अनेक प्रकारचे आजार जडत आहेत. युरिक अ‍ॅसिडचे (Uric Acid) प्रमाण वाढणे हा देखील असाच आजार आहे, जो खाण्या-पिण्यामुळे होतो.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पायाची बोटे किंवा पायाच्या अंगठ्यात वेदना आणि सूज असेल, जर घोट्याच्या आणि गुडघ्यांच्या दुखण्याने त्रस्त असाल तर हे युरिक अ‍ॅसिड वाढण्याचे लक्षण असू शकते. शरीरातील प्युरीन नावाच्या प्रोटीनच्या विघटनाने युरिक अ‍ॅसिड तयार होते. शरीरात आधीपासून काही प्रमाणात यूरिक अ‍ॅसिड (Uric Acid) असते, जे प्रति डेसीलिटर ३.५ ते ७.२ मिलीग्राम असू शकते.

यापेक्षा जास्त प्रमाणात युरिक अ‍ॅसिड शरीरात असेल तर त्याला यूरिक अ‍ॅसिड जास्त होण्याची समस्या म्हणतात. लिव्हर आणि किडनीच्या कार्यावर परिणाम होऊन युरिक अ‍ॅसिडची पातळी बिघडते. अति मांसाहारामुळे त्याची पातळी वाढू शकते. मात्र, त्यावर प्राथमिक अवस्थेत उपचार सुरू केल्यास आणि आहार संतुलित ठेवल्यास त्यावर सहज नियंत्रण ठेवता येते.

यूरिक अ‍ॅसिड वाढण्याचे तोटे

– यूरिक अ‍ॅसिडची पातळी खूप जास्त झाल्यास किडनी निकामी होते.
 मुतखडा होतो.
 रक्तदाब वाढतो.
 हृदयावर दबाव वाढल्याने हृदयविकार होण्याची शक्यता.
 सांधेदुखीचा त्रास होतो, ज्याला गाउटी अर्थरायटिस म्हणतात. त्यामुळे रुग्णाला सतत ताप येतो.

ही आहेत लक्षणे
शरीरातील पेशी आणि आपण जे खातो त्यातून युरिक अ‍ॅसिड तयार होते. यापैकी बहुतेक युरिक अ‍ॅसिड किडनीद्वारे फिल्टर केले जाते, जे लघवीद्वारे शरीरातून बाहेर येते, परंतु जर शरीरात जास्त प्रमाणात यूरिक अ‍ॅसिड तयार होत असेल किंवा किडनी फिल्टर करू शकत नसेल, तर रक्तात यूरिक अ‍ॅसिडची पातळी वाढते. नंतर ते हाडांमध्ये जमा होते आणि त्यामुळे गाउटची समस्या निर्माण होते.

युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्याने शरीराच्या स्नायूंमध्ये सूज येते. घोट्याच्या दुखण्याव्यतिरिक्त कंबर, मान, गुडघा, विशेषत: संधिवात आणि सांधेदुखीची समस्या उद्भवते. याव्यतिरिक्त, पाय आणि हातांच्या बोटांमध्ये वेदना होतात, ज्या कधीकधी असह्य होतात. लवकर थकवा येतो. त्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास, डॉक्टरांशी संपर्क साधा.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मुख्य कारण
आहारातील बदल आणि बदलती जीवनशैली हे युरिक अ‍ॅसिड वाढण्याचे सर्वात मोठे कारण आहे. कमी पाणी पिणे, दारू पिणे, हाय प्रोटीनयुक्त आहार घेणे, याशिवाय काही अनुवांशिक कारणेही असू शकतात. डायबिटीज, बीपी, कॅन्सरविरोधी औषधे आणि वेदनाशामक औषधे देखील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढवू शकतात.

दिसणारी लक्षणे

– सांधेदुखी
– बोटांना सूज
– उठ-बस करताना त्रास होणे
– सांध्यात गाठीची समस्या

या गोष्टींचे सेवन टाळा
– अल्कोहल
– रेड मीट, सी फूड
– सोडा, आइस्क्रीम, कँडी, फास्ट फूड

याचा आहारात करा समावेश
ताजी फळे आणि भाज्या, जसे की जांभुळ, संत्री, शिमला मिरची. बटाटे, भात, धान्याचा ब्रेड आणि पास्ता खाऊ शकता. युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी जांभुळ खूप फायदेशीर आहे. लिंबू हे सायट्रिक अ‍ॅसिडने समृद्ध असलेले फळ आहे जे शरीरातील अतिरिक्त यूरिक अ‍ॅसिड बाहेर काढण्यास खूप मदत करते. भरपूर पाणी प्या.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Uric Acid | health diet tips how to control uric acid

हे देखील वाचा :

Pune Crime News | आमच्या गल्लीत का आलास असे म्हणून गुंडाने डोक्यात फोडली बिअरची बाटली

Pune Crime News | पुण्यातील नामवंत हॉस्पीटलमध्ये डेडबॉडीसोबत वॉर्डबॉयनं केलं लाजिरवाणं कृत्य, माणुसकीला काळिमा फासणारी घटना

Summer Desserts | उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतील देशी मिठाईचे हे 5 प्रकार, तुम्ही ट्राय केले का?

Related Posts