IMPIMP

Uruli Devachi-Fursungi Nagar Palika | उरूळी देवाची आणि फुरसंगी येथील टी.पी. स्किम आणि कचरा डेपो आमच्याकडेच राहू द्यावा; पुणे महापालिका करणार शासनाला विनंती

by nagesh
Pune PMC - Uruli Devachi - Fursungi | The demand to create an independent municipality or municipality excluding villages is 'political'! Pune PMC News Uruli Devachi - Fursungi Hadapsar & Wagholi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Uruli Devachi-Fursungi Nagar Palika | उरूळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे पुणे महापालिकेतून Pune Municipal Corporation (PMC) वगळून या दोन्ही गावांची मिळून नवीन महापालिका करण्याचा निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घेतला आहे. या निर्णयाचा अध्यादेश काढताना उरूळी देवाची येथील महापालिकेचा कचरा डेपो (Municipal Waste Depot) आणि या दोन गावांतील टी.पी.स्किमचा (PMC TP Schme) भाग हा महापालिका हद्दीतच ठेवण्याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. (Uruli Devachi-Fursungi Nagar Palika)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महापालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर मोठयाप्रमाणावर मिळकत कर अनेक पटीने वाढल्याने उरूळी देवाची आणि फुरसुंंगी गावातील नागरिकांनी ही दोन्ही गावे वगळून परिसरातील गावांचा समावेश करून नवीन नगरपालिका स्थापन करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. मंगळवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये ही दोन्ही गावे वगळून नवीन नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे या गावांत महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या सर्वच कामांना ब्रेक लावण्यात आला आहे. परंतू दैनंदीन गरजा अर्थात पाणी पुरवठा, स्वच्छता व आरोग्य विषयी सुविधा या महापालिकेने ठेवल्या आहेत. (Uruli Devachi-Fursungi Nagar Palika)

दरम्यान गावे वगळण्याच्या निर्णयामुळे उरूळी देवाची येथील सुमारे ६६ हेक्टर जागेवर असलेल्या महापालिकेच्या कचरा डेपोचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. ग्रामस्थांच्यावतीने माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कचरा डेपो शास्त्रोक्त पद्धतीने चालवावा या अटीवर कचरा डेपो महापालिकेच्या हद्दीतच ठेवावा याला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये मान्यता दिली आहे. परंतू त्याचवेळी महापालिकेच्यावतीने फुरसुंगी आणि उरूळी देवाची या गावांमध्ये सुरू असलेल्या टी.पी. स्किमचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. महापालिकेने या टी.पी.स्किमसाठी मागील तीन ते चार वर्षांपासून मोठे परिश्रम घेतले आहेत. विशेष असे की पुर्वीचे भाजप- शिवसेना युती सरकार आणि त्यानंतरच्या महाविकास आघाडी सरकारने देखिल या टी.पी.स्किमला मान्यता दिली आहे. या मान्यतानंतर महापालिकेच्या अधिकार्‍यांनी जमीन मालकांशी वेळोवेळी बैठका घेउन त्यांची संमती मिळवत प्रकरण अंतिम टप्प्यात आणले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या परिसराचा नियोजीत विकास करण्यासाठी सुमारे ७०० कोटी रुपयांचा विकास आराखडा देखिल तयार केला
असून हा निधी उभारण्यासाठी विविध पर्यायांवरही विचार सुरू केला आहे.
या टी.पी.स्किम नगरपालिकेमध्ये गेल्यास विलंब होण्याची दाट शक्यता आहे.
शेकडो नागरिकांनी महापालिकेवर विश्‍वास दाखवून ४० टक्के जागा विनामोबदला महापालिकेस देण्याची तयारी दाखविली आहे,
त्यांच्या शासकिय योजनांवरील विश्‍वास कमी होईल.
यामुळे या टी.पी.स्किमचा गतीने विकास करण्यासाठी या तीनही टी.पी.स्किमच्या जागा महापालिकेकडेच ठेवाव्यात,
अशी विनंती राज्य शासनाला करण्यात येईल असे महापालिका प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकार्‍याने सांगितले.

Web Title :- Uruli Devachi-Fursungi Nagar Palika | Let the TP Schem and waste depot remain with PMC; Pune Municipal Corporation will make a request to the maharashtra government

हे देखील वाचा :

Manoj Bajpayee | अभिनेते मनोज बाजपेयी यांच्या आईचं निधन; वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन

NCP chief Sharad Pawar | शरद पवारांनी कर्नाटक सीमाप्रश्नी मांडली विस्तृत भूमिका; आरोप, प्रश्न आणि टीकेचा भडीमार

Sharad Pawar | ‘देशातील सर्व शक्ती एकवटल्याने गुजरातमध्ये BJP आल्याचे नवल नाही; दिल्ली, हिमाचलमध्ये भाजप हरला’ – शरद पवार

Related Posts