IMPIMP

Varsha Gaikwad | ‘शाळा नियोजित वेळेनुसारच सुरू होणार’ – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

by nagesh
Varsha Gaikwad | school will open as per schedule education minister varsha gaikwad

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Varsha Gaikwad | जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष (New Academic Year) सुरू होतं. दरम्यान एकीकडे शाळा (School) सुरू होण्याचे नियोजन आणि दुसरीकडे राज्यात पसरत असलेली कोरोनाची (Corona) संख्या पाहता सर्वजण चिंतेत पडले आहेत. ‘या पार्श्वभूमीवर शाळा नियोजित वेळापत्रकानुसारच सुरू करण्यात येतील. तसेच. सल्लागार मंडळाशी चर्चा करून शाळांना कशी काळजी घ्यावी याबाबत सूचना देण्यात येतील,’ अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी रविवारी दिली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) म्हणाल्या, “शाळा सुरू होण्याच्या तोंडावर गेली 2 वर्षे कोरोना रुग्ण वाढल्याने शाळा सुरू करण्यासाठी दिवाळीनंतरचा मुहूर्त सापडला. यंदाही विदर्भ वगळता राज्यातील इतर भागांतील राज्य मंडळाच्या शाळा 15 जूनपासून, तर विदर्भातील शाळा 29 जूनपासून सुरू करण्याचे नियोजन केले. पण, आता मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पुणे (Pune) या शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. राज्यात रोज हजार ते 1400 रुग्ण आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर यंदातरी प्रत्यक्ष शाळा सुरू होणार का? असा सवाल निर्माण झालाय. मात्र, शाळा नियोजित वेळापत्रकानुसार सुरू होतील.”

पुढे गायकवाड म्हणाल्या, “मागील 2 वर्षे प्रत्यक्ष वर्गातील शिक्षण बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे.
त्यामुळे यंदा शाळा बंद ठेवणे योग्य होणार नाही.
शाळा सुरू करण्यापूर्वी कृती दलाशी (Task Force) चर्चा करून नियमावली (Rules) जाहीर केली जाईल.
आवश्यक काळजी घेऊन शाळा सुरू करण्यात येतील.
शाळेत शिक्षक, विद्यार्थ्यांना मुखपट्टी बंधनकारक करावी का याबाबतही त्यावेळी निर्णय घेण्यात येईल.”

Web Title :- Varsha Gaikwad | school will open as per schedule education minister varsha gaikwad

हे देखील वाचा :

Pune Crime | टोळक्याकडून बांधकाम व्यावसायिकास बेदम मारहाण, कारवर केली दगडफेक; चंदननगर-खराडी परिसरातील घटना

Maharashtra Monsoon Update | राज्यात लवकरच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता – IMD

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे दर घसरले; जाणून घ्या आजचे लेटेस्ट रेट

Related Posts