IMPIMP

Vasant More | वसंत मोरेंची नाराजी दूर करायला अमित ठाकरेंची मध्यस्थी; नाराजी दूर होणार की नाही याकडे अनेकांचे लक्ष

by nagesh
Vasant More | amit thackeray called vasant more for meeting pune news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Vasant More | महाराष्ट्रात झालेल्या मस्जिदीवर भोंगे आणि हनुमान चालिसा प्रकरणात पक्षप्रमुख राज ठाकरेंपेक्षा वेगळी भूमिका घेतल्यामुळे चर्चेत असलेले पुण्याचे माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांची नाराजी दूर करण्यासाठी मनविसेचे प्रमुख अमित ठाकरे मध्यस्थी करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मनसेचे माजी शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुण्यातील कट्टर समर्थक ओळख असलेले वसंत मोरे भोंगे प्रकरणानंतर कोणत्या ना कोणत्या कारणावरून नाराज आहेत. सध्या, पुणे मनसे शहराध्यक्ष बाबू वागसकर हे शहरातील कार्यक्रमापासून वसंत मोरेंना दूर ठेवत असल्याची बाब त्यांनी अनेक वेळा उघडउघडपणे बोलली आहे. आता मोरे यांची नाराजी दूर करण्यासाठी राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे स्वतः त्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अमित ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शुक्रवारी दुपारी वसंत मोरेंना भेटीसाठी बोलवले आहे.
आता, या भेटीनंतर मोरेंची नाराजी दूर होईल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याआधी स्वतः राज ठाकरे यांनी मोरेंशी चर्चा केली होती, पण त्यानंतरही पुण्यात मनसेमधील धुसफूस कायम आहे.
महिनाभरापूर्वी पुण्यात आयोजित केलेल्या मनसेच्या एका कार्यक्रमात वसंत मोरेंना बोलण्याची संधी दिली नव्हती,
तेव्हापासून ते नाराज असल्याची चर्चा होत आहे.
यातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोरेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली होती.
त्यामुळे वसंत मोरे मनसेला रामराम ठोकून राष्ट्रवादीची वाट धरणार का, अशी चर्चा सर्वत्र सुरू होती.
मात्र, वसंत मोरेंनी ते मनसे सोडणार नसल्याचे सांगितल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

Web Title :- Vasant More | amit thackeray called vasant more for meeting pune news

हे देखील वाचा :

NCP Chief Sharad Pawar | पवारांच्या इशाऱ्याला ४८ तास उलटल्यानंतर युतीच्या दोन नेत्यांकडून शरद पवारांवर निशाणा

Rain in Maharashtra | हिवाळ्यात पाऊस; महाराष्ट्रात 11 ते 14 डिसेंबरला पाऊस

Pune Police Inspector Transfer | पुणे पोलीस आयुक्तालयातील 7 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

CitiusTech Expands Footprint | सिटीअसटेकने पुण्यात नवीन सुविधांद्वारे केला फूटप्रिंटचा विस्तार

Related Posts