IMPIMP

VBA-Shivsena Alliance | पुन्हा एकदा शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग! ठाकरे गटासोबत युती करण्यास वंचित बहुजन आघाडीचा होकार; पण…

by nagesh
Thackeray-Ambedkar Alliance | sharad pawar on uddhav thackeray and prakash ambedkar alliance

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या (VBA-Shivsena Alliance) युतीच्या चर्चा सुरु होत्या. तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना आणि काँग्रेसला युतीसाठी प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावावर शिवसेनेच्या पक्ष प्रमुखांनी म्हणजे उद्धव ठाकरे यांनी सहमती दर्शविली आहे. त्यानंतर आज वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत शिवसेना ठाकरे गटा सोबत युती करण्याची घोषणा केली आहे. या दोन पक्षांच्या युतीमुळे (VBA-Shivsena Alliance) राज्यातील राजकीय समिकरणे बलणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर म्हणाल्या, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीचे सदस्य महेंद्र रोकडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष अबूल हसन आणि वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांची शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि अन्य नेत्यांसोबत बैठक झाली होती. ही बैठक सकारात्मक झाली. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाला (VBA-Shivsena Alliance) युतीसाठी होकार कळवला असल्याची माहिती रेखा ठाकूर यांनी दिली.

रेखा ठाकूर यांनी म्हटले की, शिवसेना नेते सुभाष देसाई हे वंचित बहुनज आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना येऊन भेटले. त्यांच्यातही दोन बैठका झाल्या असून युती संबंधी सकारात्मक चर्चा झाली आहे.
वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्र विकास आघाडीत समाविष्ट करुन चार पक्षीय आघाडीतून निवडणूक लढवणार की
शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच निवडणूक लढवणार हे शिवसेनेने स्पष्ट करावे अशा मागणी वंचित कडून करण्यात आली आहे.
याबाबतीतला निर्णय त्यांच्याकडून समजला की पुढच्या टप्प्याची चर्चा सुरु होईल असंही रेखा ठाकूर यांनी म्हटले.
त्यामुळे आता वंचितने युतीबाबतच्या निर्णयाचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात गेला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- VBA-Shivsena Alliance | maharashtra politics prakash ambedkar led vanchit bahujan aaghadi announce alliance with shivsena thackeray faction

हे देखील वाचा :

Pune Rickshaw Strike | ‘बोल बच्चन अधिकारी’ म्हणत संतप्त रिक्षा चालकांचे RTO अधिकाऱ्यांना साष्टांग दंडवत

Maharashtra Police Recruitment | राज्य सरकारची मोठी घोषणा, पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

Pune-Mahavitaran | महापारेषणकडून पूर्वनियोजित दुरुस्ती कामे; शिवाजीनगर, डेक्कन परिसरात ‘या’ दोन दिवशी वीजपुरवठा बंद राहणार

MNS Chief Raj Thackeray | आम्ही फक्त प्रश्न सोडवायला असतो, आम्हाला कोणी मते देत नाही – राज ठाकरे

Related Posts