IMPIMP

Ved Teaser | रितेश-जेनेलियाच्या ‘वेड’ या चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर रिलीज

by nagesh
Ved Teaser | ved teaser release riteish deshmukh genelia deshmukh watch video

सरकारसत्ता ऑनलाईन  –  Ved Teaser | अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्या बहुचर्चित ‘वेड’ या चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर रिलीज करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत रितेश आणि जेनेलियाने या चित्रपटाची माहिती दिली होती. आता या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता अजून वाढली आहे. (Ved Teaser)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काय आहे टीझरमध्ये?

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘वेड’च्या टीझरच्या सुरुवातीला रितेश देशमुख प्रेमाबद्दल बोलताना दिसतो. जोरदार कोसळणाऱ्या पावसात फायटिंग करत असलेल्या रितेशच्या चेहऱ्यावर काहीसे रागाचे आणि व्याकूळ भाव आहेत. यादरम्यान जिनिलीयाची एंट्री होते. यानंतर सिगारेटचे झुरके घेत भर पावसात जेनेलियासमोरून जाणारा रितेश दाखवण्यात आला आहे. टीझरमधील “प्रेम असतं प्रेमासारखंच, काही वेड्यासारखं प्रेम करतात तर काही प्रेमातलं वेड होतात” हा डायलॉग प्रेक्षकांच्या मनाला भावतो. (Ved Teaser)

या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुखनेच केलं आहे तसेच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जेनेलिया
देशमुख मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या पूर्वी जेनेलियाने हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड
आणि मल्याळम अशा ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ,
विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री जिया शंकर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.
या चित्रपटातील गाणी अजय-अतुल, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. तसेच अजय- अतुल या जोडीने चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. अभिनेत्री जेनेलिया देशमुखने या चित्रपटातील अभिनयाबरोबर या चित्रपटाची निर्मितीदेखील केली आहे.

Web Title :- Ved Teaser | ved teaser release riteish deshmukh genelia deshmukh watch video