IMPIMP

Vehicle Scrappage Policy | जुन्या वाहनांच्या रजिस्ट्रेशनचं नुतनीकरण करणं होणार महाग, द्यावे लागणार 8 पट जास्तीचे पैसे, जाणून घ्या

by nagesh
Re-registration of vehicles | rules are going to change from april 1 old cars will be very heavy on your pocket understand how

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Vehicle Scrappage Policy | केंद्रिय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) जुन्या वाहनांच्या नोंदणी प्रणाणपत्र नुतणीकरण (Renew) करण्याची अधिसुचना जारी करण्यात आली आहे. याबाबत एक नवा नियम जारी केला आहे. 15 वर्ष जुन्या गाड्याची नोंदणी करण्यासाठी येत्या वर्षी 2022 मध्ये एप्रिलमध्ये जवळपास आठपट जास्त रक्कम भरावे लागणार आहेत. हा नियम म्हणजे राष्ट्रीय वाहन स्क्रॅपेज पॉलिसी (Vehicle Scrappage Policy) अर्थात वाहन भंगार धोरण आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

किती द्यावी लागणार रक्कम –
15 वर्ष जुन्या गाड्याचं (कार) नुतणीकरण (Renew) करण्यासाठी 600 रुपये फि आहे. 600 वरुन आता तीच फि 5000 रुपये होईल. त्याचबरोबर जुन्या बाइकची नोंदणी करण्यासाठी सध्या फि 300 रुपये आहे. ती आता 1000 होणार आहे. तसेच बस किंवा ट्रकसाठी फिटनेस सर्टिफिकेट नुतणीकरण करण्यासाठी फी 1500 आहे, ती 12,500 रुपये केली आहे.

दरम्यान, हे केंद्रीय मोटर वाहन नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू करण्यात येणार आहे.
महत्वाचे म्हणजे फिटनेस सर्टिफिकेटची मुदत संपल्यानंतर, त्यापुढील प्रत्येक दिवसासाठी 50 रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहेत.
त्याचबरोबर आता केंद्र सरकारने आणि आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ही योजना 15 ऑक्टोबर 2021 पासून लागू होणार आहे.
रस्ते अपघातात जखमींना Golden Hour योजना म्हणजेच अपघात झाल्यापासून 1 तासाच्या आत रुग्णालयात पोहोचवणाऱ्या व्यक्तीला 5 हजार रुपये बक्षिस म्हणून दिले जाण्याच्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. (Vehicle Scrappage Policy)

Web Title :-  Vehicle Scrappage Policy | 15 year old car vehicle registration renewal will be expensive from 2022

हे देखील वाचा :

Railway Recruitment 2021 | 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! रेल्वेमध्ये तब्बल 4103 जागांसाठी भरती, जाणून घ्या

PM Mitra पासून बोनसपर्यंतची घोषणा, जाणून घ्या कॅबिनेटच्या 2 मोठ्या निर्णयांबाबत

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 182 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts