सरकारसत्ता ऑनलाईन – Vicky Kaushal | सध्या बॉलिवूड अभिनेता विकी कौशल चर्चेत आहे. तो त्याचा आगामी चित्रपट सॅम बहादूर असेल किंवा
‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटासाठी विकी सध्या चर्चेत आहे. गोविंदा नाम मेरा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विकीने नुकताच मराठीतील लोकप्रिय
कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी केलेली धमाल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Vicky Kaushal)
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
कुशल बद्रिकेने शेअर केलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये विकी कौशल आणि इतर मान्यवर दिसत आहेत. यावेळी मराठीत डायलॉग बाजी मारत विकीने उपस्थितांची मने जिंकली. डॉक्टर काशीराम घाणेकर चित्रपटातील डायलॉग त्यांनी बोलून दाखवला यावरून त्याचे भरभरून कौतुक करण्यात आले. यानंतर जेव्हा त्याला डॉक्टर नीलेश साबळे यांनी प्रश्न विचारला की, “तुझी आवडती डिश कोणती?’ यावर विकी उत्तर देत म्हणाला, “मला मालवणी जेवण खूप आवडतं. त्याची चवच वेगळी असते. त्याचबरोबर मला मिरचीचा ठेचादेखील खूप आवडतो. बेचव जेवणालादेखील मिरचीचा ठेचा चविष्ट बनवतो”. त्याच्या या आवडीने प्रेक्षक त्याचे मनापासून कौतुक करत आहेत, तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. (Vicky Kaushal)
या व्हिडिओला सोशल मीडियावर अनेक लाइक आणि कमेंट्स येत आहेत, तर विकीच्या साधेपणाचे कौतुकदेखील केले जात आहे. एवढेच नाही तर विकीने मराठी डायलॉग बोलल्यानंतर त्याच्या चाहत्यांना हे खूपच आवडल्याचे दिसत आहे. गोविंदा नाम मेरा या चित्रपटात अभिनेता विकी कौशलबरोबर अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी यादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत, तर चित्रपटात विकीच्या मित्राच्या भूमिकेत अभिनेता अमेय वाघ दिसणार आहे, तर चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खैतान यांनी केले आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर येत्या 16 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
Web Title :- Vicky Kaushal | chala hawa yeu dya vicky kaushal talk about his favourite food and speak in marathi
Aamir Khan | आमिर खानच्या आयुष्यातील ‘तो’ प्रसंग सांगताना त्याला आश्रू अनावर; व्हिडिओ व्हायरल
Pune PMPML Bus | कोड स्कॅन करा अन् तिकीट मिळवा; ‘पीएमपीची नवी सुविधा