IMPIMP

Vijay Wadettiwar On NCP-Shivsena MLA | महिन्याभरात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या 40 आमदारांची घरवापसी; वडेट्टीवारांचा दावा

by sachinsitapure

नागपूर: Vijay Wadettiwar On NCP-Shivsena MLA | नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळीं इतरही नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र राज्यात मानाचं पान मिळवणाऱ्या शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवारांच्या (Ajit Pawar) पक्षांना केंद्रात सत्तेत न्याय्य वाटा मिळाला नाही अशी चर्चा सुरू झाली. दरम्यान महिन्याभरात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार माघारी परततील, असा दावा वडेट्टीवारांनी नागपूर येथे बोलताना केला आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, “अजित दादांना जे पाहिजे ते मिळवायचा प्रयत्न केला पण अपयश आले. कुणालाही मान सन्मान संख्याबळावर मिळतो. अजित पवारांची स्थिती सन्मान करण्यासारखी काही राहिले नाही, जे मिळेल ते खावे, राज्यमंत्रीपद मिळाले तर ठीक नाही तर तेही मिळणार नाही अशी अवस्था आहे.

भाजप सोबत घेते पण पक्ष संपवते, हे अजित पवारांना आता समजलं असेल, असा टोला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला. उद्धव ठाकरेंना समजलं तसं ते दूर गेले. भाजप हा बेईमानांचा पक्ष आहे. उपयोग झाला की फेकून द्यायचं ही त्यांची नीती आहे “, असंही वडेट्टीवार म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “गद्दारांची शिक्का लागलेली ही मंडळी आहे. बोलायला जागा नाही, ही गद्दारी शिक्का लागलेली मंडळी आहेत. पार्टी संपली आहे, गेलेले अजित दादा किंवा शिंदे यांचे ४० आमदार घरवापसी करतील” असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

Related Posts