IMPIMP

Vinayak Mete Accident | …तर विनायक मेटे वाचू शकले असते

Vinayak Mete Accident Case | cid get proof against driver in vinayak mete accident death case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Vinayak Mete Accident | विनायक मेटे यांचे अपघाती निधन हे मनाला चटका लावणारे आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे ते नेते होते. मराठा तरुणांच्या मनावर ठसा उमटवणारे लाडके नेते होते. आरक्षणाच्या बैठकीसाठी येत असताना त्यांचे अपघाती निधन झाले. ते माझे अत्यंत जवळचे मित्र होते. महायुतीचे ते लोकप्रिय नेते होते. अपघात झाल्यानंतर त्यांना लवकर रुग्णवाहिका मिळाली नाही. मदत वेळेत मिळाली असती, रुग्णालयात लवकर पोहोचले असते तर ते वाचू शकले असते, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे.

 

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि मराठा आरक्षणाचे नेते विनायक मेटे यांचे आज अपघाती निधन झाले. मराठा ठोक क्रांती मोर्चाने घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही मेटे यांना वेळीच वैद्यकीय मदत मिळाली असती तर त्यांचे प्राण वाचू शकले असते, असे म्हटल्याने अपघात मदत यंत्रणेचे वाभाडे निघाले आहेत. (Vinayak Mete Accident)

 

रामदास आठवले यांनी म्हटले की, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ते लढले, मराठा समाजाला आरक्षण मिळेल हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ पहाटे पाच वाजता विनायक मेटे यांचा अपघात झाला. यानंतर सुमारे तासभर वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा आरोप मेटेंचा चालक एकनाथ कदम यांनी केला.

 

चालकाने सांगितले की, मी रस्त्यावर गाड्या थांबविण्यासाठी झोपलो पण होतो, पण गाड्या थांबल्या नाहीत.
मला मुका मार लागला आहे. बॉडी गार्डला थोडा मार बसला आहे.
एअरबॅग होत्या म्हणून आम्ही वाचलो. छोट्या टेम्पो चालकाने मदत केली.
दरेकरांच्या बॉडीगार्डला फोन केला आणि तेव्हा यंत्रणा हलल्याचे चालकाने सांगितले.
यामुळे द्रुतगती मार्गावरील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

 

Web Title : –  Vinayak Mete Accident | ramdas athawale reaction over vinayak mete accident

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update 

हे देखील वाचा :