IMPIMP

Vinayak Mete Death | विनायक मेटे अपघात प्रकरणाला नवे वळण, 2 गाड्यांनी पाठलाग केला होता

by nagesh
Vinayak Mete Accident Case | cid get proof against driver in vinayak mete accident death case

बीड : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसंग्रामचे नेते (Shiv Sangram President) विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर (Vinayak Mete Death) अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच बीडमध्ये एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे. या कॉल रेकॉर्डिंग मधील (Call Recording Viral) संभाषणानुसार 3 ऑगस्टला मुंबईला जात असताना शिक्रापूरपासून (Shikrapur) दोन किमीपर्यंत दोन गाड्या पाठलाग करत होत्या, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, विनायक मेटे यांच्या अपघातानंतर (Vinayak Mete Death) झालेल्या घटनांची चौकशी करावी अशी मागणी त्यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे (Wife Jyoti Mete) यांनी केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

विनायक मेटे यांचे पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर (Pune-Mumbai Expressway) अपघाती मृत्यू झाला. विनायक मेटे (Vinayak Mete Death) यांच्या गाडीच्या ज्या प्रकारे अपघात (Accident) झाला, त्यावरुन काही प्रश्न उपस्थितीत करण्यात येत आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. पण, विनायक मेटे यांच्या सहकाऱ्याचा फोन रेकॉर्ड कॉल व्हायरल झाला आहे. आण्णासाहेब मायकर (Annasaheb Maikar) असं त्याचं नाव असून ते 3 ऑगस्टला मेटे यांच्यासमवेत प्रवास करत होते.

शिक्रापूरजवळ एक लहान गाव होतं, तिथे अडीच किमी पर्यंत आमचा पाठलाग करण्यात आला होता.
ती गाडी मागे येत होती, पुढे जात होती. रात्री हा प्रकार घडला होता. या गाडीतील माणसं आम्हाला हात दाखवत होती.
आम्ही गाडी थांबवून चौकशी करणार होतो, त्यावेळी मेटे यांनी गाडीचा नंबर घेऊन ठेवण्यास सांगितले.

बीड येथून मुंबईला निघाले असताना रात्री 11.30 वाजता शिक्रापूरजवळ पोहचलो. एक गाडी आमचा पाठलाग करत होती.
समोर आयशर ट्रक (Eicher Truck) होता. त्या गाडीतील माणसं आम्हाला हात करुन गाडी थांबवण्यासाठी इशारा करत होते.
मात्र, मेटे साहेबांनी गाडी थांबवण्यास नकार दिला. गाडी आयशर ट्रकच्या मागेच ठेवण्यास सांगितले होते.
पुढे एका छोट्या गावात या गाडीने आमच्या गाडीला जोरात कट मारुन निघून गेले.
मग आम्ही आशयर ट्रकला मागे टाकून पुढे निघून गेल्याची माहिती मायकर यांनी दिली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

जी गाडी आमचा पाठलाग करत होती, त्यामध्ये पाठीमागे एक जण बसलेला होता. तर पुढच्या सीटवर एक जण बसला होता.
ड्रायव्हर मिळून अशी तीन माणसं त्या गाडीत होती. या घटनेनंतर आम्ही दुसऱ्या दिवशी मेटे यांच्या भाच्याला सांगितलं होतं.
या संपूर्ण प्रकारामध्ये ड्रायव्हर समाधान मोरे आणि त्यांचा अंगरक्षक सुद्धा साक्षीदार होता, असंही मायकर यांनी सांगितलं.
असे वृत्त एका वृत्तवाहीनीने दिले आहे.

Web Title : –  Vinayak Mete Death | new twist in the vinayak mete accident case 3 august 2 cars were chasing on mumbai pune expressway

हे देखील वाचा :

Pune Crime | सिगारेट, पाण्याच्या बाटलीवरुन दोन गटात राडा; लोखंडी कात्री, दगडाने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune Rain | वरसगाव धरणही १०० टक्के भरले; पुणे जिल्ह्यातील १० धरणे १०० टक्के फुल्ल, खडकवासला धरणातून १८ हजार क्युसेक विसर्ग

MLA Prakash Surve | ‘हात तोडता आला नाही तर पाय तोडा’, शिंदे गटातील आमदाराचे चिथावणीखोर वक्तव्य

Related Posts