IMPIMP

Vinayak Raut | ‘शिवसेना संपवणारा माणूस अजून जन्मालाच आलेला नाही आणि येणारही नाही’; ’40 आमदार आणि 12 खासदार जरी विकत घेतले असतील तरी…

by nagesh
Sanjay Raut | maharashtra in unsafe state in country say sanjay raut allegation shinde government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन बिहारमध्ये नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपची (BJP) साथ सोडून राजद (RJD), काँग्रेस (Congress)
आणि मांझी यांच्यासोबत आघाडी करुन सरकार स्थापन केले. यावरुन भाजपने आपण महाराष्ट्रात शिवसेना (Maharashtra Shiv Sena) का फोडली
हे सांगत नितीश कुमार यांना थेट इशारा दिला. सुशीलकुमार मोदी (Sushil Kumar Modi) यांनी शिवसेनेने देखील महाराष्ट्रात असाच विश्वासघात केला
होता, म्हणूनच आम्ही शिवसेना फोडली. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांनाच आम्ही तोडले असे म्हटले. मोदींच्या या वक्तव्यावरुन शिवसेना
खासदार (Shivsena MP) विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेना संपवणारा माणूस अजून जन्मालाच आलेला नाही आणि येणारही नाही, असे विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी भाजपवर टीका केली आहे.

विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले, भाजपच्या त्रासाला कंटाळून नितीश कुमार आता भारतीय जनता पक्ष सोडून गेले. शिवसेनेला परिणाम भोगावे लागणार नाही. सुशील मोदी किंवा आणखी कुणीच शिवसेना संपवू शकणार नाहीत. आमदार (MLA), खासदार (MP) विकत घेतले तरी शिवसेना संपवू शकत नाही, असं राऊत म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महाराष्ट्रातील शिवसेना, देशातील शिवसेना ही भाजपच्या कपटकारस्थानामुळे पूर्वीपेक्षा आता अधिक गतीने उभी राहते. भले 40 आमदार आणि 12 खासदार विकत घेतले असतील. मात्र शिवसेना तुम्ही संपवू शकत नाही. शिवसेना संपवणारा माणूस अजून जन्मालाच आलेला नाही आणि येणारही नाही, असं म्हणत विनायक राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

Web Title : –  Vinayak Raut | shivsena vinayak raut slams bjp over political situation

हे देखील वाचा :

Pune Crime | पठाणकोट येथील गुन्ह्यात फरार असलेल्या बोगस आर्मी ऑफिसरला गुन्हे शाखेकडून अटक

Food And Herbs To Increase Fertility | फर्टिलिटी वाढवण्यासाठी पुरुषांनी करावे ‘या’ 15 फूड्स आणि हर्ब्जचे सेवन, वाढेल स्टॅमिना

Devendra Fadnavis | ‘…ते खातेवाटप सपशेल चुकीचं ठरेल एवढंच सांगतो’ – देवेंद्र फडणवीस

Related Posts