IMPIMP

Vinayak Raut | ‘गद्दारांना पुन्हा घरात घेऊ नका, ती कीड आहे’ – विनायक राऊत

by nagesh
MP Vinayak Raut | shivsena MP Vinayak Raut on cm eknath shinde group mp prataprao jadhav

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – शिवसेनेत बंड झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात दुसरी शिवसेना तयार झाली आहे. या दोनही शिवसेनेमध्ये वाद सुरु आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन केले आहे. राऊत यांनी केलेल्या आवाहनावर खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ज्यांनी एकदा बेईमानी केली, ते बेईमानच आहेत. त्यांना परत घेणे म्हणजे घराला कीड लावण्यासारखे आहे, असे विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटातच विरोधाभास असल्याचे स्पष्ट होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आम्ही आशेवर जगणारे लोक नाही. आम्हाला कर्तुत्वार सर्व काही पुन्हा नव्याने उभे करायचे आहे. आमचा पहिला विजय अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri By Election) झाला आहे. भाजपने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, अशी विनंती आम्ही केली नव्हती. राज्यात पुढील सहा महिन्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता आहे. ज्यांनी एकदा बेईमानी केली ते बेईमानच आहेत. बेईमानीला पुन्हा एकदा घरात थारा देणे, म्हणजे घरात कीड लागण्यासारखे आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रेबाबत आणि सरकारच्या वैधतेबाबत खटला सुरु आहे. यावर जानेवारी किंवा फेब्रुवारीत निर्णय येणे अपेक्षित आहे. हा निकाल काय येईल, हे स्पष्टच आहे. या निकालानंतर कदाचित राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल. त्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, असे विनायक राऊत यावेळी म्हणाले.

शेवटची गद्दारी खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांच्या रुपात झाली.
ती आम्हाला अपेक्षितच होती. त्यांनी शिवसेना पक्षाच्या अस्तित्वावला हात घालण्याचा प्रयत्न केला.
याच कारणामुळे शिवसैनिक पेटून उठला आहे. त्यांनी कितीही गद्दारी केली,
तरी शिवसैनिक त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे देखील विनायक राऊत यावेळी म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Vinayak Raut | vinayak raut criticizes eknath shinde rebel mla group said mid term election will takes place

हे देखील वाचा :

Rajkumar Rao-Shahnaz Gill | काय सांगता, खरच राजकुमार राव वडील होणार ?, शहनाज गिलसमोर केला मोठा खुलासा

Devendra Fadanvis | “चार जागांसाठी शिवसेनेची बेईमानी…”; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा

Raju Shetti | बदल्यांच्या नावाखाली मंत्री आणि त्यांचे बगलबच्चे अधिकाऱ्यांकडून खंडणी वसूल करतात, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Related Posts