IMPIMP

Violation of Rera Act in Pune | पुण्यात RERA कायद्याचे उल्लंघन करुन दस्त नोंदणी ! 11 अधिकारी आणि कर्मचारी तडकाफडकी निलंबित; 33 जणांची चौकशी सुरू, कारणे दाखवा नोटीस

by nagesh
Pune Crime | finally suspended that teacher bhigwan Indapur taluka of pune crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनरेरा कायद्याचे (Rera Act) उल्लंघन (Violation of Rera Act in Pune) करुन बिनबोभाट दस्त नोंदणी करणाऱ्या दुय्यम निबंधक कार्यालयातील (Deputy Registrar Office) 44 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नोंदणी महानिरीक्षक यांनी (Inspector General of Registration) कारवाई केली आहे. कारवाई करण्यात आलेल्यापैकी 11 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित (Suspended) करण्यात आले आहे. तर उर्वरित अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी (Inquiry) सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती नोंदणी उपमहानिरीक्षक Deputy Inspector General of Registration (मुख्यालय) गोविंद कराड (Govind Karad) यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. (Violation of Rera Act in Pune)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून (Department of Registration and Stamp Duty) मिळालेल्या माहितीनुसार, रेरा कायद्याचे उल्लंघन (Violation of Rera Act in Pune) करुन दुय्यम निबंधक कार्यालयातील काही अधिकारी – कर्मचारी दस्त नोंदणी करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
प्राप्त तक्रारीच्या पार्श्वभूमीवर दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 3 (Secondary Registrar Haveli No. 3)
या कार्यालयासह पुण्यातील इतर दुय्यम निबंधक कार्यालयात कशा प्रकारे दस्त नोंदणी केली जाते याची तपासणी करण्यासाठी पथक नेमण्यात आले होते.

पथकाने केलेल्या तपासणीमध्ये 44 अधिकारी, कर्मचारी यांनी 10 हजार 561 दस्तऐवजांची नोंदणी केल्याचे आढळून आले.
याचा अहवाल राज्य सरकारला (State Government) सादर करण्यात आला.
यावर राज्य सरकाने 3 मार्च 2022 रोजी संबंधित दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई (Administrative Action) करण्याचे निर्देश दिले.
त्यानुसार सोमवारी (दि.4) 7 अधिकारी – कर्मचारी यांना व 4 अधिकारी – कर्मचारी यांना पुर्वीच निलंबित करुन विभागीय चौकशी (Departmental Inquiry) सुरु करण्यात आली आहे.
9 अधिकारी – कर्मचारी यांची विभागीय चौकशी सुरु करुन त्यांच्या बदलीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
तर 8 अधिकारी – कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  Violation of Rera Act in Pune | stamp duty registration violation of RERA Act in Pune 11 officers and staff suspended Inquiry into 33 persons started show cause notice

हे देखील वाचा :

BMC Mayor Kishori Pednekar | महापौर किशोरी पेडणेकरांनी सांगितला धमाल किस्सा; म्हणाल्या – ‘हो तो कागद मी गिळला’

LIC Jeevan Shiromani Plan | 16 वर्षापर्यंत भरावा लागेल प्रीमियम, नंतर LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये मिळेल रू. 1 कोटी रिटर्न

Diabetes Diet | उन्हाळ्यात शुगर कंट्रोल करण्यासाठी प्रभावी आहेत ‘हे’ 5 हेल्दी ड्रिंक, बॉडी ठेवतील कूल; जाणून घ्या

Related Posts