IMPIMP

Vishwajeet Kadam | कडेगांव नगरपंचायत निवडणुकीत मंत्री विश्वजीत कदमांना मोठा धक्का; भाजपची बाजी

by nagesh
Vishwajeet Kadam | maharashtra minister vishwajeet kadam reveal about mva government formation shivsena leader sanjay raut

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन – Vishwajeet Kadam | राज्यातील 106 नगरपंचायत निवडणुकीच्या उमेदवारांचे भवितव्य आज (बुधवारी) ठरताना दिसत आहे. यातच सांगलीच्या (Sangli News) कडेगांव नगरपंचायतीत (Kadegaon Nagar Panchayat Results) काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. खरंतर काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांना मोठा धक्का मानला जातो. कडेगांव विश्वजित कदम यांचा बालेकिल्ला आहे. मात्र त्यांना अपयश आलं आहे. या ठिकाणी भाजपने (BJP) आपली बाजी मारली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कडेगांव नगरपंचायतीमध्ये भाजपने (BJP) तब्बल 11 जागांवर विजय मिळवला आहे. आणि काँग्रेसला (Congress) केवळ 5 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. त्याचबरोबर या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) एक उमेदवार विजयी झाला आहे. विशेष म्हणजे कडेगांवमध्ये काँग्रेसची सत्ता दिवंगत मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्यामुळे होती. त्यांच्यानंतर कडेगांवात मागील काही दिवसांपासून म्हणावी तशी कामे झाली नाहीत. याचाच परिणाम नगरपंचायत निकालावरून दिसत आहे. त्यामुळे सध्याचे राज्यमंत्री विश्वजित कदम यांना मोठा धक्का बसला आहे. आता कडेगांव नगरपंचायत निवडणुकीत भाजपचं वर्चस्व प्रस्थापित झालं आहे.

Web Title :- Vishwajeet Kadam | kadegaon nagar panchayat election set back for congress leader vishwajeet kadam bjp gets majority

हे देखील वाचा :

Income Tax Saving Tips | आई-वडिलांची देखभाल करून सुद्धा वाचवू टॅक्स, जाणून घ्या काय आहे नियम

7th Pay Commission DA Hike | एक कोटीपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी-पेन्शनर्सला लागली लॉटरी, 3 टक्के वाढणार DA; आता इतकी मिळेल पेन्शन

Gold Silver Price Today | सोन्याचा भाव ‘जैसे थे’ तर चांदीच्या दरात घट; जाणून घ्या आजचे दर

Related Posts