IMPIMP

Vodafone Idea मध्ये Amazon करू शकते मोठी गुंतवणूक, शेअरमध्ये जोरदार तेजी

by nagesh
Vodafone Idea | vodafone idea share rises after reports of huge investment from amazon bse nse

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाVodafone Idea | गेल्या काही काळापासून अडचणीत असलेल्या व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) चे शेअर्स सोमवारच्या व्यवहारात रॉकेट ठरले. ई – कॉमर्स कंपनी Amazon कडून व्होडाफोन आयडियाला 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक मिळू शकते, ही बातमी बाहेर येताच या टेलिकॉम कंपनीच्या शेअरनी झेप घेतली आणि सुमारे 5 टक्क्यांनी तो वर चढला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

इतका उसळला व्होडा आयडियाचा शेअर
व्यवहारादरम्यान व्होडा आयडिया शेअर (Voda Idea Share) ने BSE वर 4.81 टक्के उसळी घेत रु. 9.36 च्या इंट्रा-डे उच्चांकावर (Intra-Day High) पोहोचला. गेल्या दोन सत्रात टेलिकॉम कंपनीचा शेअर 7.33 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.

कंपनीचा शेअर सध्या 5 दिवस आणि 20 दिवसांच्या सरासरीच्या वर व्यवहार करत आहे. मात्र, तो अजूनही 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या सरासरीपेक्षा खाली आहे. आज आलेल्या तेजीने व्होडा आयडिया एमकॅप वाढून 30 हजार कोटी जवळ पोहोचले. (Vodafone Idea)

दीर्घकाळापासून गुंतवणूकदारांच्या शोधात कंपनी
सध्या तिसर्‍या क्रमांकाची दूरसंचार कंपनी व्होडा आयडिया भांडवल उभारण्यासाठी आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी गुंतवणूकदार शोधण्यात व्यस्त आहे. कंपनी या गुंतवणुकीचा वापर नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी देखील करू शकते.

यापूर्वीच्या सरकारी हस्तक्षेपामुळे व्होडाफोन आयडिया दिवाळखोरीच्या उंबरठ्यापासून वाचली. व्होडाफोन आयडियाने या वर्षी जानेवारीमध्ये सांगितले की त्यांच्या बोर्डाने संपूर्ण एजीआर देय रक्कम आणि व्याज इक्विटीमध्ये रूपांतरित करण्यास मान्यता दिली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सरकारकडे असेल इतका हिस्सा
थकबाकी आणि व्याज इक्विटीमध्ये रूपांतरित केल्यानंतर, सरकारची व्होडा आयडियामध्ये 35.8 टक्के भागीदारी असेल.
यासह, सरकार व्होडा आयडियाचे सर्वात मोठे भागधारक बनेल.

यानंतर, कंपनीत प्रवर्तक व्होडाफोन समूहाची भागीदारी 28.5 टक्के असेल आणि आदित्य बिर्ला समूहाची हिस्सेदारी सुमारे 17.8 टक्के असेल.
मार्च तिमाहीत कंपनीला 6,563 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

Web Title :- Vodafone Idea | vodafone idea share rises after reports of huge investment from amazon bse nse

हे देखील वाचा :

Chia Seeds Benefits | पचन आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी ‘हा’ आहे रामबाण उपाय; जाणून घ्या

Best Postpaid Recharge Plans | ‘या’ टेलिकॉम कंपन्यांकडे आहे बेस्ट पोस्टपेड प्लान ! डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक मिळतील फायदे; जाणून घ्या

ACB Trap On API Swapnil Masalkar | तक्रार अर्जावरून गुन्हा दाखल न करण्यासाठी 70 हजाराची लाच स्वीकारताना एपीआय एसीबीच्या जाळ्यात

Related Posts