IMPIMP

Weight Loss Food | पाण्यात भिजवून खा हे Dry Fruit, कंट्रोलमध्ये राहिल तुमचे वजन

by nagesh
Weight Loss Food | soaked walnut for weight loss food obesity belly fat burning tips diabetes digestion strong bone health

सरकारसत्ता ऑनलाइन –  Weight Loss Food | वाढणारे वजन हे कुणालाही त्रासदायक ठरते. एकदा पोटावर आणि कंबरेभोवती पोटाची चरबी जमा झाली की मग त्यातून सुटका करणे खूप कठीण होऊन बसते. अशावेळी तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत आणि खाण्याच्या सवयींमध्ये बदल करणे गरजेचे आहे. ग्रेटर नोएडा येथील GIMS हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या प्रसिद्ध आहारतज्ञ डॉ आयुषी यादव (Dr. Ayushi Yadav) यांनी सांगितले की, अक्रोड (Walnuts) भिजवून खाल्ल्यास लठ्ठपणा (Obesity) सोबतच इतर अनेक समस्यांपासून सुटका मिळते. हे ड्राय फ्रूट (Dry Fruit) इतके फायदेशीर का आहेत ते जाणून घेऊया (Benefits Of Soaked Walnut).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

न्यूट्रीएंट्सचे पॉवर हाऊस आहे अक्रोड
आपल्या दैनंदिन आहारात ड्राय फ्रूट (Dry Fruit) चा समावेश केला पाहिजे कारण त्याला पोषक तत्वांचे पॉवर हाऊस म्हणतात. यापैकी एक आहे अक्रोड (Walnut). जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, दररोज मूठभर अक्रोड खाल्ल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होतात. शरीर आणि मन दोन्हीसाठी हे औषधापेक्षा कमी नाही. हा प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फायबरचा समृद्ध स्रोत आहे. याशिवाय कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न, कॉपर, फॉस्फरस, सेलेनियम, झिंक, मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड आणि ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्स (Calcium, Potassium, Iron, Copper, Phosphorous, Selenium, Zinc, Monounsaturated Fatty Acids, Omega-3 Fatty Acids) अक्रोडमध्ये आढळतात. रोज 2 ते 3 भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात ते जाणून घेवूयात.

भिजवलेले अक्रोड खाण्याचे फायदे

1. वजन कमी करण्यास उपयुक्त
ज्यांना वाढते वजन कमी (weight loss) करता येत नसेल त्यांनी रोज भिजवलेले अक्रोड खावे कारण त्यात प्रोटीनचे प्रमाण जास्त असते आणि कॅलरीज कमी आढळतात.

2. मधुमेहावर गुणकारी
सध्याच्या युगात मधुमेह (Diabetes) ही एक गंभीर समस्या बनली आहे, या आजाराने त्रस्त लोकांसाठी सकस आहार हा सर्वोत्तम पर्याय आहे. अशावेळी, दररोज 2-3 भिजवलेले अक्रोड खाल्ल्यास ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित (Blood Sugar Level Control) करणे सोपे होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

3. डायजेशन होईल व्यवस्थित
ज्या लोकांना अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या (Indigestion, Gas, Constipation) आहे.
त्यांनी सकाळी भिजवलेले अक्रोड खावे. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनक्रिया चांगली राहते.

4. हाडे होतील मजबूत
अक्रोड हे असेच एक ड्राय फ्रूट आहे ज्यामध्ये अल्फा-लिनोलेनिक अ‍ॅसिड आढळते.
याच्या मदतीने आपल्या शरीराची हाडे मजबूत होतात. म्हणूनच अक्रोड खाणे आवश्यक आहे.

Web Title :- Weight Loss Food | soaked walnut for weight loss food obesity belly fat burning tips diabetes digestion strong bone health

हे देखील वाचा :

Pune Crime | सिस्टर ऑफ द क्रॉस ट्रस्टच्या अध्यक्षांच्या नावाने 6 लाखांना गंडा

Panvel MNS | पनवेलमध्ये मनसेला मोठे खिंडार, माजी जिल्हाध्यक्षांसह 65 जण शिंदे गटात

Pune Crime | पीएमपी बसचालकाला प्रवाशांची मारहाण; खडकी बस डेपोतील घटनेत ९ जणांवर गुन्हा दाखल

Related Posts