IMPIMP

WhatsApp वर अमूलकडून 6000 रुपये कमावण्याचा मेसेज आला तर व्हा Alert, रिकामे होईल बँक अकाऊंट

by nagesh
WhatsApp | fraud alert received message on whatsapp for monthly earning rs 6000 from amul bank account may be empty

नवी दिल्ली : वृत्तसंस्था WhatsApp | देशभरात सायबर गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. फोन कॉल, मेसेजेस, ईमेलद्वारे फसवणूक (Cheating) करून लोकांची बँक खाती खुलेआम लुटली जात आहेत. सध्या डेयरी प्रॉडक्ट बनवणार्‍या अमूल (Amul) कंपनीच्या नावावर लोकांना निशाणा बनवले जात आहे. तुम्हाला सुद्धा अमूलकडून दरमहिना 6,000 रुपयांची कमाई करण्याची संधी देणारा मेसेज आला असेल तर सावध व्हा. (WhatsApp)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मेसेजमध्ये पाठवलेल्या लिंकद्वारे फसवणूक

अमूलच्या नावाने पाठवल्या जात असलेल्या या लिंकवर क्लिक केल्यास तुम्ही एका वेबसाइटवर पोहचता या पेजच्या सर्वात वर अमूलचा लोगो लावलेला आहे. यामध्ये खाली, ‘Amul 75th Aniversary’ आणि खाली मोठ-मोठ्या अक्षरात ‘Congratulation’ लिहिले आहे.

याच्या खाली एक लाईनमध्ये ‘प्रश्नावलीद्वारे 6000 रुपये मिळवण्याची संधी मिळेल’ लिहिले आहे. या खाली तुम्हाला प्रश्न दिसेल. याचे उत्तर दिल्यानंतर तुम्हाला तीन प्रश्न विचारले जातील. यानंतर तुमच्या स्क्रीनवर 9 बॉक्स आहेत, जे अमूलच्या लोगोसारखे डिझाईन केले आहेत. यामध्ये कोणत्याही एक बॉक्सवर क्लिक करण्यासाठी तीन संधी दिल्या जातात. तुम्ही बॉक्स क्लिक केल्यानंतर 6000 रुपये जिंकता.

हे सर्व इथेच संपत नाही, सर्वात मोठा खेळ या फ्रॉडचा हा आहे की तुम्हाला हे 6000 रुपये तेव्हा मिळतील, जेव्हा तुम्ही या लिंकला 20 मित्रांना किंवा 5 व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेयर कराल. विशेष म्हणजे यामध्ये खाली काही कमेंट्ससुद्धा दिल्या आहेत.

कमेंटमध्ये अनेक लोकांनी लिहिले आहे की त्यांना 6000 रुपये मिळाले.
काहींनी लिहिले आहे कॅम्पेनची ही पद्धत खुप चांगली आहे.
ही पूर्ण साईट अशाप्रकारे डिझाइन केली आहे पहिल्यांदा पाहणारा कोणताही शिक्षित माणूस फसू शकतो.
याच लिंकच्या माध्यमातून लोकांची बँक खाती रिकामी केली जात आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अमूलने लोकांना सावध करण्यासाठी जारी केली माहिती

अमूलने एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, अमूलकडून जनहितासाठी जारी.
एक फेक मेसेज व्हॉट्सअप आणि दुसर्‍या सोशल मीडियावर (WhatsApp) एक स्पाम (SPAM) लिंकसोबत शेयर केला जात आहे.
या लिंकवर अजिबात क्लिक करू नका. यामध्ये पुढे लिहिले आहे की अमूल कोणतेही असे कॅम्पेन चालवत नाही.
आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना हा मेसेज जास्तीत जास्त शेयर करा.

Web Title : WhatsApp | fraud alert received message on whatsapp for monthly earning rs 6000 from amul bank account may be empty

हे देखील वाचा :

Rakesh Jhunjhunwala | ‘या’ 5 कारणांमुळे राकेश झुनझुनवाला म्हणाले असावेत का? – ‘आता आपली वेळ आलीय !’

Pune Crime | ED ने जप्त केलेल्या बिल्डर डी. एस. कुलकर्णी (DSK) यांच्या 40 हजार चौरस फुटातील ‘सील’बंद बंगल्यात चोरी; प्रचंड खळबळ

Gold Silver Price Today | सोने-चांदी आज किती झाले ‘स्वस्त’, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा नवीन दर

Related Posts