IMPIMP

मेटा WhatsApp मध्ये लवकरच करणार मोठा बदल, ग्रुप अ‍ॅडमिनला मिळेल ही Power

by nagesh
WhatsApp | meta whatsapp will soon make a big change will give new power to admin

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाइतर इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपच्या तुलनेत आता WhatsApp मध्ये युजर्ससाठी अनेक बदल केले जात आहेत. मेटाने यापूर्वी
अ‍ॅपमध्ये अनेक अपडेट्स आणण्याबाबत म्हटले होते. ज्या अंतर्गत WhatsApp ग्रुपमधील सदस्यांची संख्या वाढवण्यात आली. त्याचबरोबर आता हे अ‍ॅप
ग्रुप अ‍ॅडमिनला एक महत्त्वाचा अधिकार देणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

बीटा टेस्टिंगमधून जात आहे अपडेट

Meta चे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp ला इतरांपेक्षा चांगले काम करायचे आहे. कंपनीने युजर्ससाठी नवीन अपडेट्स आणले आहेत. यापूर्वी अ‍ॅपच्या वैशिष्ट्यांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. रिपोर्टनुसार, नवीन फीचर आल्यानंतर सोशल मीडिया ग्रुप्समध्ये सुधारणा केली जाऊ शकते. सध्या, अ‍ॅपच्या अपडेटची बीटा टेस्टिंग सुरू आहे. फक्त बीटा टेस्टर्सना यात प्रवेश देण्यात आला आहे.

ग्रुप अ‍ॅडमिनला मिळेल हा अधिकार

नवीन मेटा बदलामुळे आता व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना पूर्वीपेक्षा जास्त फीचर्स मिळणार आहेत.
यासोबतच ग्रुप अ‍ॅडमिनलाही जास्त अधिकार दिले जातील.
एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅपच्या आगामी फीचर अपडेटनंतर ग्रुप अ‍ॅडमिन ग्रुपमधील कोणाचेही मेसेज डिलीट करू शकतो.

मेसेज हटवल्यानंतर दिसेल रिस्पॉन्स

जर ग्रुप अ‍ॅडमिनने मेसेज डिलीट केला तर तो ग्रुपच्या इतर सदस्यांना कळेल.
मेसेज डिलीट केल्यानंतर, ग्रुपशी कनेक्ट युजर्सना This was deleted by an admin दिसेल.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सदस्यांची मनमानी संपेल

व्हॉट्सअ‍ॅपमधील नव्या बदलांनंतर आता ग्रुपमधील सदस्यांची मनमानी संपणार आहे. यामुळे अ‍ॅडमिनला एक सुपर पॉवर मिळेल.
ज्याच्या मदतीने तो कोणताही चुकीचा मेसेज सहजपणे डिलीट करू शकेल.

WABetaInfo चा रिपोर्ट

व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन अपडेट फीचर्सवर नजर ठेवणारी साइट WABetaInfo च्या ताज्या रिपोर्टमध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे.
रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून मेसेज डिलीट केल्यानंतर सदस्यांना समजेल की अ‍ॅडमिनने मेसेज डिलीट केला आहे.

Web Title : – WhatsApp | meta whatsapp will soon make a big change will give new power to admin

हे देखील वाचा :

Aadhaar Voter ID Link | आधारसोबत मतदारांचे नाव जोडले जाण्याच्या कामाचा शुभारंभ आजपासून, जाणून घ्या – कशी आहे पूर्ण प्रक्रिया

Pune Crime | अंगाला नको तेथे स्पर्श करुन चिमटा काढून दुकानात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; वानवडी पोलिसांकडून एकाला अटक

Shivsena | खरी शिवसेना कुणाची हे निवडणूक आयोगाला ठरवू द्या, एकनाथ शिंदे यांचं प्रतिज्ञापत्र

Related Posts