IMPIMP

WhatsApp New Features | व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन अपडेटमध्ये लवकरच येतील 8 नवीन फिचर्स, वापर करणे होईल आणखी सोपे; जाणून घ्या

by nagesh
WhatsApp | meta whatsapp will soon make a big change will give new power to admin

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाWhatsApp New Features | येत्या काही दिवसात व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) यूजरला आणखी सुविधा मिळणार आहेत. लवकरच व्हॉट्सअ‍ॅप Andoroid, iOS यूजर्ससाठी नवीन अपडेट जारी करणार आहे. या अपडेट व्हर्जनमध्ये अनेक असे फिचर्स मिळतील जे व्हॉट्सअ‍ॅपचा (WhatsApp New Features) वापर आणखी सोपा, आरामदायक आणि सुरक्षित करतील.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

अनेक दिवसांपासून टेस्टिंग

व्हॉट्सअपवर लक्ष ठेवणार्‍या WABetaInfo नुसार, कंपनी अनेक नवीन फिचर्सवर अनेक दिवसांपासून टेस्टिंग करत आहे.
यापैकी 2-3 ची सुरूवात काही यूजर्सपासून केली आहे. येत्या काही दिवसात व्हॉट्सअपवर येणार्‍या 8 नवीन फिचर्सबाबत (WhatsApp New Features) जाणून घेवूयात…

1. माय कॉन्टॅक्ट अ‍ॅक्सेट…

अँड्रॉईड betav 2.21.23.14 व्हर्जनमध्ये यूजर्सला माय कॉन्टॅक्ट अ‍ॅक्सेप्टचा ऑपशन मिळेल.
यामध्ये लास्ट सीन, स्टेटस, प्रोफाइल फोटो आणि अबाऊट सारखे डिटेल कोण पाहू शकते, हे तुम्ही निवडू शकता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

2. कम्युनिटी फिचर

हे फिचर ग्रुप अ‍ॅडमिनला जास्त पावर देईल. यामध्ये ग्रुपच्या आत सुद्धा ग्रुप बनवण्याची सुविधा मिळेल.
या नवीन फिचरमध्ये ग्रुपचा अ‍ॅडमिन कम्युनिटी इन्व्हाईट लिंकद्वारे नवीन यूजर्सला आमंत्रित करू शकतो. (WhatsApp New Features)

याशिवाय तो दुसर्‍या मेंबर्सला मेसेज सुद्धा पाठवू शकतो.
सर्व ग्रुपमध्ये होणारे चॅटसुद्धा एंड-टु-एंड एन्क्रिप्टेड होईल.

3. डिसअ‍ॅप्पीयरिंग मेसेज ऑपशनमध्ये सुधारणा

रिपोर्टनुसार, व्हॉट्सअप या फिचरमध्ये बदल करत आहे. अगोदर यामध्ये एखादा मेसेज 7 दिवसानंतर गायब होण्याचा ऑपशन होता परंतु आता यामध्ये 24 तास, 7 दिवस आणि 90 दिवसाचा ऑपशन मिळेल. तुम्ही ठरवलेल्या वेळेनंतर ते मेसेज आपोआप डिसअ‍ॅप्पीयर होतील.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

4. विना इंटरनेट अनेक डिव्हाईसवर वापर

व्हॉट्सअप आता आपल्या यूजर्ससाठी Multi-device Beta प्रोग्रामच्या अंतर्गत या फिचरचा अर्ली अ‍ॅक्सेस देत आहे.
यामध्ये तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वेबच्या अंतर्गत आपले अकाऊंट फोनमध्ये इंटरनेट नसेल तरी सुद्धा कम्प्युटर आणि लॅपटॉपवर अ‍ॅक्सेस करू शकता.

तुम्ही 4 डिव्हाईसवर लॉगिन करू शकता. कंपनीचा दावा आहे की, या फिचरमध्ये सुद्धा एंड टु एंड एन्क्रिप्शनची सुविधा दिली आहे.
म्हणजे तुमचे चॅट, मीडिया आणि कॉलची गोपनीयता राहील. मात्र, जर मेन डिव्हाईस 14 दिवसापासून जास्त वेळापर्यंत डिस्कनेट राहिला तर लिंक्ड डिव्हाईसमधून तुमचे व्हॉट्सअप वेब अकाऊंट आपोआप लॉग आऊट होईल.

5. मेसेजवर रिअ‍ॅक्ट करण्याचा पर्याय

व्हॉट्सअपमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामप्रमाणे कोणत्याही मेसेजवर रिअ‍ॅक्ट करण्याचा पर्यायावर रिअ‍ॅक्ट करण्याचा पर्याय मिळेल.
यासाठी तो मेसेज काहीवेळ होल्ड करावा लागेल. यानंतर रिअ‍ॅक्शनसाठी वेगवेगळ ऑपशन दिसतील.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

6. व्हॉईस मेसेज पाठवण्यापूर्वी ऐकू शकता

या फिचर अंतर्गत व्हॉईस मेसेज पाठवण्यापूर्वी तो ऐकू शकता. यामध्ये स्टॉप बटन सुद्धा दिले जाणार आहे.
आता व्हॉईस मेसेज ऐकू शकता आणि मेसेज योग्य वाटला नाही तर पाठवण्याऐवजी डिलिट करू शकता.

7. कॉन्टॅक्ट कार्डचे नवीन डिझाईन

नवीन अपडेटमध्ये कॉन्टॅक्ट कार्ड नवीन डिझाईन मिळेल. कॉन्टॅक्ट कार्ड म्हणजे, जेव्हा व्हॉट्सअपवर एखाद्या कॉन्टॅक्टच्या प्रोफाइलवर क्लिक करण्याच्या जवळ जी टॅब उघडते त्यालाच कॅन्टॅक्ट डिझाईन कार्ड म्हणतात.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

8. इमोजी उघडला किंवा नाही, मिळेल माहिती

आता तुम्ही चॅटिंगच्या दरम्यान कुणालाही इमोजी पाठवता तेव्हा तो उघडला किंवा नाही हे समजत नाही.
(WhatsApp New Features) पण आता व्हॉट्सअप एक नवीन फिचर आणत आहे.
या अंतर्गत तो इमोजी डाऊनलोड न झाल्यास तुम्हाला मेसेज मिळेल की, इमोजी उघडू शकत नाही किंवा तुम्ही व्हॉट्सअपचे जे व्हर्जन वापरत आहात ते यास सपोर्ट करत नाहीत.

Web Title : WhatsApp New Features | whatsapp 8 new features that you may be able to use soon multidevice login and much more know in details

हे देखील वाचा :

Gadchiroli | गडचिरोलीमध्ये पोलिस अन् नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक ! मोठ्या नेत्यासह 26 नक्षलवाद्यांचा ‘खात्मा’, 4 पोलिस जखमी

Janadhan Account | ‘जनधन’च्या खातेदारांनी तात्काळ करावं ‘हे’ काम ! अन्यथा लाखो रुपयांचे होईल नुकसान; सरकारने जारी केला आदेश

Kangana Ranaut | कंगनाच्या विरूध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी; पोलिसांकडे तक्रार

Related Posts