IMPIMP

Whatsapp New Update | आता 4 डिव्हाईसमध्ये चालेल व्हॉट्सअ‍ॅप, मोबाइल इंटरनेट कनेक्शनची सुद्धा नाही गरज; जाणून घ्या

by nagesh
WhatsApp | whatsapp new standalone app for windows users can now message and chat without having phone from desktop

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूजर्ससाठी नवनवीन अपडेट (Whatsapp New Update) आणत असते. आता कंपनीने मल्टी-डिव्हाईस फीचर लाँच केले आहे, याच्या मदतीने कुणीही यूजर चार डिव्हाईसमध्ये व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटचा वापर करू शकतो. या फीचरची विशेष बाब ही आहे की हे मिळाल्यानंतर यूजर्सला व्हॉट्सअ‍ॅपला लॅपटॉप, टॅबलेट किंवा एखाद्या इतर डिव्हाईसवर वापरण्यासाठी फोन इंटरनेटला सतत कनेक्ट ठेवण्याची आवश्यकता (Whatsapp New Update) नाही.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

या फीचरच्या मदतीने व्हॉट्सअ‍ॅप वेब यूजर्स स्मार्टफोनशिवाय विना इंटरनेट कनेक्शनवर मेसेज पाठवू शकतात आणि प्राप्त करू शकतात. स्माटफोनशिवाय व्हॉट्सअ‍ॅप वेबचा वापर करण्यासाठी, वापरकर्त्याला बीटा प्रोग्रामध्ये सहभागी व्हावे लागेल. यानंतरच यूजर हे फीचर (whatsapp multi device support) वापरू शकतो. हे फीचर एंड-टू-एंड एन्क्रिप्शनचे समर्थन करते, म्हणून याच्या माध्यमातून करण्यात आलेले सर्व चॅट सुरक्षित राहिल, असा कंपनीचा दावा आहे.

तुम्हाला सुद्धा बीटाच्या या व्हर्जनमध्ये सहभागी व्हायचे असेल आणि स्मार्टफोनशिवाय व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करायचा असेल तर तुम्हाला स्मार्टफोन व्हॉट्सअ‍ॅपच्या त्या व्हर्जनसोबत लिंक करावे लागेल, ज्याचा ते वापर करत आहे, ज्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप वेब, डेस्कटॉप किंवा पोर्टलचा समावेश (Whatsapp New Update) आहे.

मात्र, ही प्रक्रिया केवळ एकवेळ करण्याची आवश्यकता आहे. यानंतर यूजर्स आपल्या स्मार्टफोनशिवाय सुद्धा व्हॉट्सअ‍ॅप वेब अ‍ॅक्सेस करू शकतील. काही उपकरणांसाठी फीचरमध्ये थेट व्हॉट्सअ‍ॅप वेब किंवा डेस्कटॉपच्या माध्यमातून ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगचा सुद्धा समावेश आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

असे सहभागी व्हा मल्टी-डिव्हाईस फीचरच्या बीटा प्रोग्राममध्ये

  • आपल्या स्मार्टफोनवर व्हॉट्सअ‍ॅप उघडा.
  •  होमपेजच्या वरील उजव्या कोपर्‍या तीन डॉटवर क्लिक करून मेनूमध्ये जा.
  • लिंक्ड डिव्हाईसेसवर टॅप करा.
  • व्हॉट्सअप मल्टी-डिव्हाईसबाबत माहिती दिसेल.
  • खाली जॉईन बीटा प्रोग्राम दिसेल, सहभागी व्हायचे असल्यास त्यावर टॅप करा.
  • लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा टॅबलेटवर व्हॉट्सअप उघडा.
  • स्मार्टफोनवर स्कॅनरच्या माध्यमातून डिव्हाईसवर क्यूआर कोड स्कॅन करा.
  • दोन्ही डिव्हाईस आता कनेक्ट होतील आणि व्हॉट्सअ‍ॅप वेब मेसेज सिंक्रोनाईज करतील.
  • एकदा कनेक्ट झाल्यानंतर वापरकर्ता व्हॉट्सअ‍ॅप वेबच्या माध्यमातून मेसेज पाठवू आणि प्राप्त करू शकतील. (Whatsapp New Update)

Web Title : Whatsapp New Update | whatsapp new update how how to use whatsappweb without connecting via smartphone

हे देखील वाचा :

Mumbai Cruise Drugs Case | कोण आहेत आर्यन केसमधील नवीन NCB अधिकारी संजय सिंह, ‘या’ प्रकरणांचा केला होता तपास

Gold-Silver Price | दिवाळी संपताच 0.3% ‘स्वस्त’ झाले सोने, चांदी घसरून 63,741 रुपयावर आली

CBSE | सीबीएसईने 10 वी – 12 वी च्या परीक्षेबाबत घेतला मोठा निर्णय ! जारी केली नवीन मार्गदर्शकतत्त्वे

Related Posts