IMPIMP

WhatsApp आणतंय Voice मेसेजसाठी अतिशय विशेष फीचर, यूजर्सला मिळेल नवीन ‘ऑपशन’; जाणून घ्या

by nagesh
WhatsApp Privacy Setting | these five settings are useful for whatsapp users if you will on this setting than nobody can spy you

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  WhatsApp | फेसबुकची कंपनी इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअपॅ (WhatsApp) आपले सध्याचे व्हॉईस मेसेज फंक्शन (Voice message function) अपग्रेड करण्यासाठी नवीन फीचरवर काम करत आहे. कंपनी ग्लोबल व्हॉईस मेसेज प्लेयरवर काम करत आहे, जे यूजर्सला दुसर्‍या चॅटमध्ये गेल्यानंतर सुद्धा दुसर्‍याचा व्हॉईस मेसेज ऐकण्याची परवानगी देईल. म्हणजे अगोदर जेव्हा एका चॅटमध्ये आलेल्या मेसेजला आपण ऐकत होतो तेव्हा दुसर्‍या चॅटमध्ये जाताच ते बंद होत होते, परंतु आता नवीन फीचर आल्यानंतर असे होणार नाही.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अ‍ॅपचे हे अपडेट सध्या बीटा टेस्टर्ससाठी डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे. याशिवाय, व्हॉट्सअप (WhatsApp) डिसअ‍ॅपियरिंग मेसेज फीचरसाठी अपडेट दत आहे.
ज्यामुळे मेसेज गायब होण्यासाठी 24 तास, 7 तास आणि 90 दिवसांचा कालावधी ठरवू शकता. हे फीचर सध्याच्या काळात iOS बीटा टेस्टर्ससाठी सादर केले आहे.

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, कंपनी ग्लोबल व्हॉईस मेसेज प्लेयर टेस्ट करत आहे, जेणेकरून चॅट बंद केल्यानंतर सुद्धा व्हॉईस मेसेज सुरू राहतो.
याचा अर्थ व्हॉईस मेसेज व्हॉट्सअपच्या होम स्क्रीनवर असेल, आणि टॉपवर पिन होईल, ज्यामुळे यूजर्स दुसरे चॅट पहात सुद्धा मोठा व्हॉईस मेसेज ऐकू शकतील.

Voice मेसेज करू शकता Pause

यूजर्स व्हॉईस मेसेज पॉज, आणि डिसमिस सुद्धा करू शकतात. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार व्हॉईस मेसेज प्लेयर अँड्रॉईड यूजर्ससाठी सुद्धा उपलब्ध करून दिला जाईल.
व्हॉट्सअप मोठ्या कालावधीपासून आपल्या व्हॉईस मेसेज चांगले बनवण्यासाठी काम करत आहे.
यामध्ये अनेक फीचर्स, जसे प्लेबॅक स्पीड टॉगल आणि आणि कॉन्झीक्यूटिव्ह मेसेज जोडले गेल आहेत.
अ‍ॅप ट्रांस्क्रिपशन फीचर सुद्धा टेस्ट करत आहे आणि यातून यूजर्सला चांगला अनुभव देण्याच्या प्रयत्नात आहे.

Web Title : WhatsApp | whatsapp is working on news feature users can check other chat while listening to some other chats voice messages

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात 28 वर्षीय महिला वकिल, त्यांच्या पतीवर कोयत्याने सपासप वार; भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या

Yavatmal Crime | खळबळजनक ! काँग्रेस शहर अध्याक्षाच्या घरात रंगला जुगाराचा अड्डा, 14 जणांना ठोकल्या बेड्या

SBI PO Recruitment 2021 | SBI मध्ये 2056 जागांसाठी बंपर भरती, जाणून घ्या प्रक्रिया

Related Posts