IMPIMP

Winter session 2021 | राज्यसभेत गोंधळ घालणार्‍या 12 खासदारांचं निलंबन; काँग्रेससह शिवसेनेच्या दोघांचा समावेश

by nagesh
Winter Session 2021 | 12 rajya sabha mps suspended for rest of winter session in parliament

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Winter session 2021 | संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून (दि.29) सुरु आहे. राज्यसभेत पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्याप्रकरणी 12 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. पावसाळी अधिवेशनात घातलेल्या गोंधळामुळे ही कारवाई केली गेली आहे. दरम्यान, या कारवाईमुळे निलंबित खासदारांना (MP) हिवाळी अधिवेशनावेळी (Winter session 2021) सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. यामध्ये CPM आणि CPI चे प्रत्येकी एक, काँग्रेसचे (Congress) सहा, तृणमूल काँग्रेस (TMC) आणि शिवसेनेचे (Shivsena) प्रत्येकी दोन असे खासदार आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

संसदेच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान झालेल्या गदारोळामुळे 12 राज्यसभेच्या खासदारांचं निलंबित करण्यात आलं. निलंबित खासदारांमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेच्या (Shiv Sena) खासदारांचा समावेश आहे. दरम्यान, ही कारवाई हिवाळी अधिवेशनासाठी करण्यात आलीय. या पार्श्वभुमीवर 12 खासदारांना (MP) आज (दि. 29) रोजी पासून सुरू झालेल्या अधिवेशनात सहभागी होता येणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. (Winter session 2021)

12 खासदार कोण आहेत?

1. फुलो देवी नेताम (काँग्रेस)

2. छाया वर्मा (काँग्रेस)

3. रिपुन बोरा (काँग्रेस)

4. एलामरम करीम (सीपीएम)

5. बिनय विश्वम (सीपीआय)

6. राजामणी पटेल (काँग्रेस)

7. डोला सेन (तृणमूल)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

8. प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना)

9. अनिल देसाई (शिवसेना)

10. अखिलेश प्रसाद सिंह (काँग्रेस)

11. शांता छेत्री (तृणमूल)

12. सय्यद नासिर हुसेन (काँग्रेस)

Web Title : Winter Session 2021 | 12 rajya sabha mps suspended for rest of winter session in parliament

हे देखील वाचा :

Bigg Boss 15 | तेजस्वी प्रकाश आणि करणा कुंद्राच्या नात्यावर राखीचा पति रितेशने उपस्थित केले प्रश्न, म्हणाला…

Kangana Ranaut | कंगना रणावतच्या आयुष्यात कोणा ‘खास’ची एन्ट्री, शेअर केली रोमँटिक पोस्ट

TV खरेदीसाठी जाताय का? ‘या’ 5 गोष्टी आवश्य पाहून घ्या, अन्यथा नंतर वाढू शकते चिंता!

Related Posts