IMPIMP

Yavatmal Crime | खळबळजनक ! काँग्रेस शहर अध्याक्षाच्या घरात रंगला जुगाराचा अड्डा, 14 जणांना ठोकल्या बेड्या

by nagesh
Pune Crime | Thieves attack DSK Dreamcity security guards in Pune!

यवतमाळ :  सरकारसत्ता ऑनलाइनयवतमाळ (Yavatmal Crime) येथील संकटमोचन परिसरात राहणारे काँग्रेसचे यवतमाळ शहर अध्यक्ष (congress city president) चंद्रकांत चौधरी (Chandrakant Chaudhary) यांच्या घरात जुगाराचा (Gambling Den) रंगला होता. अवधूतवाडी पोलिसांना (Avdhut Wadi police) याची माहिती मिळताच पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून 14 जणांना अटक (14 arrest) केली. या कारवाईमुळे यवतमाळ शहरात (Yavatmal Crime) प्रचंड खळबळ उडाली आहे. ही कारवाई रविवारी रात्री करण्यात आली असून 6 लाख 870 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

यवतमाळ (Yavatmal Crime) नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते नगरसेवक तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष चंद्रकांत हरिकिशोर चौधरी यांच्या फ्लॅटमध्ये जुगार सुरु होता.
पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून मधुकर प्रेमचंद गावंडे (रा. अंबानगर), राजकुमार केशवराव बनसोडे (रा. कोलुरा, ता. नेर), सुभाष राजाराम वानखेडे (रा. अंबानगर), दीपक बापूराव थोरात (रा. दारव्हा रोड), विजय अशोकराव सुरस्कर (रा. जयविजय चौक), उमेश रमेश उपाध्ये (रा. देवीनगर), श्रीकांत मारोतराव बावणे (रा. साईनगर), राजबहाद्दूर किशोरीलाल राजपूत (रा. शारदा चौक), अल्पेश रणजित फुलझेले (रा. उमरसरा), शेख हकीम शेख करीम (रा. गिलाणीनगर), नितीन डोमाजी चव्हाण (रा. कावेरी पार्क), दर्शन रमेश कोठारी (रा. दाते कॉलेज चौक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी छापा टाकताच तेथून 2 लाख 15 हजार 870 रुपये रोख, 14 मोबाईल, 8 दुचाकी, असा एकूण 6 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी अवधूतवाडी पोलीसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ (SP Dr. Dilip Patil Bhujbal),
अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे (Additional Superintendent of Police Khanderao Dharne),
पोलीस निरीक्षक मनोज केदारे (Inspector of Police Manoj Kedare)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे (PSI Nagesh Khade),
संजय राठोड, गजानन दुधकोहळे, कुणाल पांडे, सागर चिरडे, समाधान, कांबळे, प्रकाश चरडे यांच्या पथकाने केली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title :-  Yavatmal Crime | gambling den home congress city president 14 arrested Yavatmal news

हे देखील वाचा :

SBI PO Recruitment 2021 | SBI मध्ये 2056 जागांसाठी बंपर भरती, जाणून घ्या प्रक्रिया

PM-Kisan | खुशखबर ! शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये येऊ शकतात 2000 ऐवजी 4000 रुपये, परंतु यांना मिळणार नाही ‘लाभ’

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा भाववाढ; जाणून घ्या पुणे शहरातील आजचे इंधनाचे दर

Related Posts