Yerwada Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, येरवडा परिसरातील घटना
पुणे : Yerwada Pune Crime News | येरवडा परिसरात एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने गळफास (Minor Girl Hanging) घेऊन आत्महत्या (Suicide Case) केली आहे. तर तिची मैत्रीण जास्त दारू पिल्यामुळे बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तनिषा शांताराम मनोरे (वय-16) असे आत्महत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे.
हा प्रकार येरवडा पोलीस स्टेशन (Yerawada Police Station) हद्दीमधील वडार वस्ती, सेवक चौक जवळ, लक्ष्मी नगर येरवडा येथे घडला आहे. तनिषा मनोरे हिची 16 वर्षाची मैत्रीण दारू पिऊन बेशुद्ध अवस्थेत तिच्याच घरी आढळून आली. या मुलींनी एकत्र येऊन दारू पिली. त्यानंतर अती दारु पिल्याने त्यांनी उलट्या केल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळक (Sr PI Ravindra Shelak) यांनी दिली.
रविंद्र शेळके यांनी सांगितले की, मुली त्यांच्या ओळखीचा 16 वर्षीय मुलला फोन करुन त्याच्या घरी आल्या होत्या. तो घरी आला असता त्याला तनिषाने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याने तनिषाला खाली उतरवून तिच्या तोंडावर पाणी मारले. तसेच तिच्या आईला याबाबत माहिती देऊन बोलवून घेतले. तनिषाला तातडीने ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
दरम्यान, तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणीने अती प्रमाणात दारु पिल्याने ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. तिच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देऊन त्यांना बोलवून घेण्यात आले. तिला देखील उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मयत तनिषा हिचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे रविंद्र शेळके यांनी सांगितले.
Comments are closed.